जालना (प्रतिनिधी) : भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने जागर अभियानाच्या संबंधाने १२ ऑक्टोबर २०२१ मंगळवार रोजी, श्रीहरी पॅव्हेलियन, दर्गा रोड, सिग्मा हॉस्पीटल, जवळ संभाजी नगर, (औरंगाबाद) येथे ओबीसीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील मेळाव्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेशअण्णा टिळेकर, ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज भैया अहिर, ओबीसी मोर्चा प्रभारी संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, या मोर्चासाठी मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार, जि.प. प.स. सदस्य, नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
ओबीसींच्या आरक्षणाचा केलेला खेळखंडोबा आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी या विभाग स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत आणि ओबीसींच्या घराघरापर्यंत जनजागृती करण्यासाठी पंढरपूर येथून जागर अभियानाला सुरुवात झाली आहे. या मोर्चासाठी जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, प्रदेश उपाध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, युवक जिल्हाध्यक्ष रोहित नलावडे, तालुकाध्यक्ष सतीश केरकळ यांनी केले आहे.
Leave a Reply