ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जगदीश भारती यांचा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे सत्कार

December 2, 202115:29 PM 45 0 0

उरण दि 1(संगीता ढेरे) :  गौरवमयी व उत्कृष्ट अशी 38 वर्षाची सेवा पूर्ण करून दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी बेलापूर नवी मुंबई येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश नारायण भारती सेवानिवृत्त झाले.त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आनंदी हॉटेल उरण मधे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरणचे वैभव शिवाजी पवार-उरण तालुका अध्यक्ष,निलेश कन्हैयालाल गोहिल-आय.टी सेल प्रमुख उरण ,अडव्होकेट प्रीती जगदीश भारती(रांजणे)-उरण तालुका अध्यक्ष महिला आघाडी,स्नेहा सचिन गोडे- उरण तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी आदी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.या सर्वांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश भारती यांना सेवानिवृत्त बद्दल शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *