उरण(संगिता पवार) उरण तालुक्यातील वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांच्या नवीमुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने बदल्या करण्यात आल्या असून,उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी जगदीश कुलकर्णी यांनी नियुक्ती करण्यात आली असून,न्हावाशेवा बंदर वाहतूक शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक पदी निरज चौधरी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
जगदीश कुलकर्णी यांनी मुंबई क्राईम ब्रँच व 2019 – 20 या वर्षात उरण पोलिस ठाणे येथे सक्षमतेने काम केले असून, कोरोना काळातही कोरोनापासून नागरिकांच्या बचावासाठी नियोजनबद्ध काम केले आहे.7 महिन्यांपूर्वी त्यांची बदली नवीमुंबई आयुक्तालय सुरक्षा शाखा येथे झाली होती.
मात्र जनतेसाठी जिव्हाळ्याने कार्यरत असणारे यांची पुन्हा एकदा उरण वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या जागी असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांना नवीमुंबई सुरक्षा शाखा येथे बदली करण्यात आली आहे.
तर न्हावाशेवा बंदर वाहतूक विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी वर्णी लागलेल्या निरज चौधरी यांनी उपराजधानी नागपूर येथे व ठाणे येथे वाहतूक विभागात या अगोदर काम केल्याचा त्यांचा डांनगा अनुभव आहे.त्यांच्या ठिकाणी काम करीत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत कामत यांची बदली नवी मुंबई बॉम्ब शोधक पथकामध्ये करण्यात आली आहे.
दोन्ही वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांसमोर वाहतूक कोंडी समस्येचे मोठे आव्हान आहे.उरण वाहतूक शाखेकडे गोदामे आणि उरण शहर तर न्हावाशेवा वाहतूक विभागाकडे जागतिक ख्यातीच्या जेएनपीटी,जीटीआय,एनएसआयसीटी व भारत कंटेनर टर्मिनल चौथे बंदर अशा चार बंदरांसह विविध टॅंकिंग कंपन्यांच्या अवजड वाहतूक सुरळीत राखण्याची जबादारी आहे.
Leave a Reply