ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागरण माय मराठीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

March 2, 202217:00 PM 41 0 0

मुरुड जंजिरा (सौ नैनिता कर्णिक) : कोकण मराठी साहित्य परिषद व सार्वजनिक वाचनालय मुरुड जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्त “जागर माय मराठीचा कार्यक्रम सार्वजनीक वाचनालयात उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमासाठी कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड अध्यक्ष संजयजी गुंजाळ, कार्याध्यक्ष अरूणजी बागडे, उपाध्यक्षा उषा खोत सार्वजनिक वाचनालय मुरुड अध्यक्ष संजयजी भायदे,कार्यवाह विनय मथुरे,प्रमुख वक्त्या सेवानिवृत्त प्राध्यपिका सुरेखा सबनीस मॅडम, नगरपरिषद मुरुड प्रशासनअधिकारी दीपाली दिवेकर मॅडम या सर्व मान्यवरांनी प्रथम दीपप्रज्वलन केले.तद्नंतर कवी कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर,गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. याच वेळी ग्रंथाना व काढलेल्या चित्रांना पुष्प अर्पण करण्यात आली.
मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाची सुरुवात डाॅक्टर रविंद्र नामजोशी यांच्या सुरेल गायनाने झाली.व याला प्रतिभा मोहिले,उमा बागडे,ऊर्मिला नामजोशी
तबला,पेटीवादक अरूणजी बागडे, सयेश सुर्वे मंदार मुंबईकर यांनी साथ दिली. प्रतिभामोहिलेनी मोगरा फुलला या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविकात संजयजी गुंजाळ यांनी कार्यक्रमाची रुपरेखा सांगीतली.व संजयजी भायदे यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संजयजी भायदे यांनी आपल्या मनोगतात सार्वजनिक वाचनालयाला आज १४० वर्ष पूर्ण झाली. तसेच वाचनालयाला डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले.
प्रमुख पाहुण्यां तथा वक्त्या प्राध्यापिका सुरेखा सबनोस यांनी मराठी भाषेचे महत्त्व व मराठी भाषेबद्दल आज होत असणारी भेसळ या बाबत उदाहरणेद्वारा खूपच सुंदर स्पष्टीकरण केले. प्रमुख वक्त्या प्रशासनाधिकारी दिपाली दिवेकर मॅडम यांनी आपण दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो उदा:- शर्ट,सावकार, पुरस्कार असे अनेक शब्द सागून हे शब्द आपले मराठी नसल्याचे प्रतिपादन केले.व स्वातंत्रवीर सावरकर यांच्या मराठी भाषेविषयी असणारी जडणघडण व विचार या विषयी उत्तमरितीने सांगितले.
कार्यक्रमाला अधिक शोभा आली ती चित्रकार,रांगोळीकार अच्युत चव्हाण व त्याचा सुपुत्र शिवम चव्हाण यांनी स्व.लता मंगेशकर, स्वातंत्र्यवीर सावरकर,कवी कुसुमाग्रज यांच्या
काढलेल्या चित्रांमुळे रसिकांची मने भारावून गेल्यामुळे सर्वांनी मनापासून कौतुक केले. व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. कार्यक्रमात अच्युत चव्हाण कविता आशिष पाटील , योगेश दवटे यांनी स्वरचित गाणी,रायगड युवा अध्यक्ष सिध्देश लखमदे गझल, को म.सा.प.शाखा दादर सल्लागार अलकनंदा कविता वासंती उमरोटकर रामदास स्वामीची पत्नी अभिवाचन ,शशिकांत भगत स्वअनुभव अरूणजी बागडे सावता माळी अभंग,अशा विविधतेतून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रपतीना पत्र पाठविण्याचा उपक्रम राबवण्यात आला व ही सर्व पत्रे मुरुड पोस्टमन विरकुड यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली. सुरेखा सबनीस यांनी वाचनालयाला काही पुस्तके भेट म्हणून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनअस्मिता पेंडसे यांनी अतिशय उत्तम केले.या कार्यक्रमास माजी अध्यक्षा प्रतिभाताई जोशी,सेवानिवृत्त तहसीलदार नयन कर्णिक, डाॅ. मधुकर वेदपाठक सर, तसेच अनेक रसिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिध्देश लखमदे,आशिष पाटील,योगेश दवटे,विवेक भगत अच्युत चव्हाण विनय मथुरे यांनी मोलाचे सहकार्य केले .नैनिता कर्णिक यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.डाॅ.नामजोशी यांच्या भैरवीने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *