ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कुंडलिका नदी पुल नवनिर्मीतीसाठी शुक्रवारी जलसमाधी आंदोलन ; रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांचा इशारा

September 30, 202113:48 PM 11 0 1

जालना ( प्रतिनिधी) : जालना शहरालगत असलेल्या कुंडलिका नदी वरील पुलाची नवनिर्मीती करण्यास प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई च्या निषेधार्थ शुक्रवारी ( ता. 01) जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा रासप चे जिल्हा संपर्क प्रमुख ओमप्रकाश चितळकर यांनी दिला आहे.


या संदर्भात बुधवारी ( ता. 29) ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली रासप च्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जालना- घनसावंगी रस्त्यावरील रोहनवाडी नजीक असलेल्या कुंडलिका नदीवरील पुलाची तात्काळ नवनिर्मीती करावी यासाठी रासपतर्फे पावसाळ्यापूर्वी निवेदन दिले होते. शिवाय जीवितहानी टाळण्यासाठी वेळोवेळी स्मरणपत्रे ही दिली. परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले. परिणामी येथे जीवीत हानी झाली. शिवाय शंभर गावांचा संपर्क तुटला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, आरोग्य, शेतमाल वाहतूक यास अनंत अडचणी येत आहेत. या बाबी वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्या नंतर ही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ( ता. 01)सकाळी 10.30 च्या सुमारास रासप तर्फे जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा ओमप्रकाश चितळकर यांनी लेखी निवेदनात दिला . निवेदनावर ओमप्रकाश चितळकर, अॅड. श्रीराम हुसे, अॅड संभाजी चुनखडे, अॅड शीतल खांडेभराड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *