ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना, १३ सप्टेंबर २०२१ जालना सहकारी साखर कारखाना लि.रामनगर सुरु करा – अरुण वझरकर

September 14, 202113:02 PM 86 0 0

जालना (प्रतिनिधी): जालना सहकारी साखर कारखाना सुरु करा असी मागणी एका निवेदनाद्वारे कामगार व सभासद यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. निवेदनावर श्री.अरुण सराटे, श्री.लक्ष्मण घोडके, श्री.लक्ष्मण शिंदे, श्री.बन्सीधर आटोळे, श्री.मदन एखंडे, यांच्या सह अनेक कामगार व सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहे. माजी खासदार कै. बाळासाहेब पवार यांनी रामनगर येथील माळरानावर जालना सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून तो यशस्वीपणे देखील चालवला होता, कै.बाळासाहेब पवार यांच्या नंतर सदर साखर कारखान्यामध्ये गचाळ राजकारण होऊन, कर्जमुक्त झालेला साखर कारखाना कर्जबाजारी झाला. अत्यंत कमी कर्ज थकले असतानाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सदर साखर कारखाना “सरफेसी” कायदा अंतर्गत मे. तापडिया कंस्ट्रक्शन, औरंगाबाद यांना अल्प किंमतीमध्ये विक्री केला, त्यांनी साखर कारखाना चालू केला नाही आणि सन २०१६ मध्ये त्यांनी सदर कारखाना मे.अर्जुन शुगर इंडस्ट्रीज लि.जालना यांना विक्री केला.


निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, सदरील रामनगर साखर कारखाना खरेदी विक्री व्यवहारामध्ये साखर कारखाना चालू करणेचे व कामगारांचे थकीत पेमेंट अदा करणेचे खरेदीदाराने खरेदी खतामध्ये आश्वासन दिले होते. त्याच हेतूसाठी त्यांनी साखर कारखाना खरेदी केला होता, परंतु खरेदीदाराने अद्याप जालना सहकारी साखर कारखाना चालू ही केला नाही आणि कामगारांचे थकीत पेमेंट ही अदा केले नाही.
मागील तीन वर्षापासून पर्जन्यमान चांगले असल्याने तसेच जालना व बदनापूर तालुक्यातील सोमठाणा मध्यम प्रकल्प, वाल्हा मध्यम प्रकल्प व राजेवाडी मध्यम प्रकल्प तसेच जालना तालुक्यातील पिरकल्याण मध्यम प्रकल्प, पिंपळवाडी मध्यम प्रकल्प, तसेच सावंगी तलाव मध्यम प्रकल्प व वाकी मध्यम प्रकल्प तसेच छोटी छोटी अनेक साठवण तलाव ओसंडून वाहत असल्याने ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे, मागील दोन वर्षापासून इतर साखर कारखान्याने सुद्धा ऊस नेण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
तसेच जालना साखर कारखाना बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारे साखर कामगार देशोधडीला लागले आहेत, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच अनेक कामगारांनी आर्थिक विवेचनामुळे आत्महत्या केल्या आहेत.
शेवटी निवेदनामध्ये कामगार व सभासदांनी साखर कारखाना चालू करा अशी अर्त मागणी कामगार व सभासदांनी मा.जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *