जालना/प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हाअध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 9/4/2021 रोजी नुतनवसाहत जालना येथे एका खाजगी ठिकाणी पत्रकार परिषदेत जिल्हाअध्यक्ष बोलत होते की कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व लोक प्रतिनिधी लाँकडाउन करून जनसामान्यांच्या मुळावर उठलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या या पत्रकार परिषदेत विशेष उपस्थिती म्हणून अकबर इनामदार, अॅड कैलास रत्नपारखी, विष्णू खरात हे होते. अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने दोन दिवसात लाँकडाऊन शासनाने छोटे छोटेउद्योगाना लाँकडाऊन मध्ये सुट दिली नाही तर आम्ही जालना जिल्ह्यात तीव्रस्वरूपाचे रस्त्यावर उतरून आंदोलन करू. डिपाँझिट घेतल्याशिवाय कोणताही पेशेन्टला अँडमिट करुन घेत नाहीत. सोबत संपर्कात आलेल्याना कोरानटाईन न करता कोरोनाने डेथ झालेली व्यक्तीची बाँडी सरांश नातेवाईकांना घरी देत असल्याने कोरोना वाढत आहे.
मेडिकल औषधाचा व बैठका शासकीय रुग्णालयात तुटवडा निर्माण झाला आहे. प्रशासन जिल्ह्यात कोविड रोखण्यास असफल ठरली आहे. मूर्त्यांचि आकडेवारी सुद्धा नोंदणी होत नाही. कंपनी चालू प्रोडक्शन चालू पण छोटे दुकाने बंद म्हणजे हातावरील पोट असणार्यांना येथील सुस्त प्रशासनाने संपविण्याचाच विडा उचलला आहे. येत्या दोन दिवसात लाँकडाऊन नाही उघडले तर वंचित बहुजन आघाडीचे आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते छोटे छोटे उद्योजकांना सोबत घेऊन हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून सर्व सामन्यांना न्याय देऊ प्रशासनाने किती गुन्हे आमच्यावर दाखल करायचे असेल तर खुशाल करावे असे जिल्हाअध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाअध्यक्ष डेव्हिड घुमारे, अकबर इनामदार, अँड कैलास रत्नपारखी, विष्णू खरात, ज्ञानेश्वर जाधव, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखी, किशोर जाधव, प्रा. संतोष आढाव, प्रशांत कसबे, गौतम वाघमारे, अमोल लोखंडे,प्रशांत भांगरे सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Leave a Reply