ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना गणेश फेस्टीवल- वतीने संपना चौधरीचासह विविध कलावंताची जालनेकरासाठी सांस्कृतिक मेजवानी अध्यक्ष भास्करराव दानवे

August 30, 202217:22 PM 9 0 0

जालना  :  गणेश फेस्टीवलची स्थापना 2002 साली झाली असुन . जालना गणेश फेस्टीवल च्या माध्यमातुन काही अपवादात्मक परिस्थिती वगळता सातत्याने कार्यक्रम घेण्यात आले. फेस्टीवलच्या माध्यमातुन जालना शहरात सर्व सामाजिक, राजकीय संस्था, व्यक्ती सर्वांना सोबत घेवुन विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रमां सोबतच आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, विविध क्रिडा स्पर्धा, ख्यातनाम वक्त्यांची व्याख्याने, किर्तन, कवि-संमेलन, कथा, सिंचन परिषद, या प्रकारचे विविध उपक्रम राबविले आहेत.

निखळ मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाचेही काम जालना फेस्टीवलने केले आहे. जालना गणेश फेस्टीवलच्या माध्यमातुन महिला, लहान मुले, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, जेष्ट नागरिक या सर्वांना सामावुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोरानाच्या महामारीमुळे गणेश फेस्टीवलच्या बहुरंगी कार्यक्रमात खंड पडला होता, तो यावर्षी आपण नव्या जोमाने उत्सव साजरा करत आहोत. यावर्षीची कार्यकारिणी आम्ही सोबतच्या यादीमध्ये जाहीर करत आहोत. या सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात येत असुन जालना शहर व जिल्हयातील नागरीक तथा गणेश भक्तांनी हजारोच्या संख्येने आयोजीत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जालना गणेश फेस्टीवलच्या वतीने अध्यक्ष भास्करराव दानवे,संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, कार्याध्यक्ष संजय खोतकर, कोषाध्यक्ष अशोक पांगारकर, सचिव दिनेश फलके सर्व पदाधिका-यांनी केले आहे.

यावेळी 1 सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राची हास्ययात्रा कलाकार समिर चौगुले विशाखा सुभेदार गौरव मोरे वनिता खरात 2 सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता लावण्यरंग भावना मुंबईकर ज्योती सोलापूरकर हर्ष पुणेकर मधु मोना 3 सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या लोकमेळा गोधळ डाॅ गणेश चंदशिवे आणि सहकारी भारूड योगेश चिकटगाव आणि सहकारी पोपडा शाहीर यशवंत जाधव आणि लावणी लावणी सम्राज्ञी रेष परिटेक सह प्रमिला लोदगेकर 4 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता संपना चौधरी यांचा भरदार कार्यक्रम नुत्याचा बहारदार कार्यक्रम पार पडनार असुन विविध कार्यक्रम जालना गणित फेस्टिवल मध्ये पार पडणार असल्याची माहिती जालना गणेश चे अध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली.
यावेळी कार्यकारिणी अध्यक्ष भास्करराव दानवे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील कार्याध्यक्ष संजय खोतकर कोषाध्यक्ष अशोक पांगारकर सचिव दिनेश फलके यावेळी संस्थापक संयोजन समिती राजेंद्र राख, , शरद देशमुख, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, अशोक उबाळे, अशोकराव आगलावे, चंद्रशेखर वाळींबे, किरण गरड, ज्ञानेश्वर कदम, अजिंक्य घोगरे, प्रसाद वाढेकर,सुरेश मुळे, उपाध्यक्ष गणेश सुपारकर, धन्नुभैय्या कार्बलिये, प्रा. कार्तिक गांवढे, , सिध्दीविनायक मुळे, , गोवर्धन कोल्हे., कार्यालयीन सचिव :- प्रा. राजेंद्र भोसले, , संजय देठे संदिप गिंदोडीया, सहसचिव : सुशिल भावसार, अमोल ठाकुर, राहुल मुळे, अनिल व्यवहार, सल्लागार समितीसाईनाथ पवार, आदींची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *