जालना (प्रतिनिधी) जालना नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर उर्दु व संस्कृत भाषेत नाव लिहण्यात यावे, अशी मागणी उम्मत बचाओ तहरीक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत आ. कैलाश गोरंट्याल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारत देश विवधितामध्ये एकता असणारा जगात एकमेव देश आहे. येथे विविध धर्म, जाती, भाषा, बोली बोलणारे लोक वास्तव्य करतात. उर्दु व संस्कृत भाषा हे भारतातील प्राचीन भाषा आहे. जालना शहरातील उर्दु कवी व साहित्यकार यांनी शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. शहरात बरेच विद्यार्थी संस्कृत भाषेत ज्ञानार्जना घेत आहे. त्यामुळे जालना नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर कार्यालय नगर परिषद जालना हे उर्दु व संस्कृत भाषेत टाकण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर अध्यक्ष शेख अब्दुल हमीद, डॉ. सय्यद आरेफ, अस्लम कुरेशी, शेख शब्बीर, मोहम्मद आसेफ बागवान, फईम बागवान, शेख ईजाज, मुश्ताक खान, शेख निसार, जुनेद बागवान, वसीम इनामदार आदिंची नावे आहेत.
Leave a Reply