ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना  विक्रम काबरे यांचा क्षत्रिय राजपूत समाजातर्फे सत्कार

February 3, 202214:06 PM 41 0 0

जालना ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन तर्फे जालना जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा -2022 मध्ये ” जालना श्री” हा मानाचा किताब मिळवल्या बद्दल विक्रम काबरे ( विक्की राजपूत) यांचा सर्व क्षञिय राजपूत समाजातर्फे सत्कार करण्यात आला. अंबड चौफुली नजीक असलेल्या सुयेशा लॉन्स येथे मंगळवारी ( ता. 01) सायंकाळी झालेल्या सत्कार सोहळ्यास कुणाल ठाकूर ,डॉ .योगेश कच्छवाह ,अमोल ठाकूर,करण राजपूत,किशोर ताजी , नागेश बेनिवाल,गौरव ठाकूर, विक्रांत ठाकूर ,लखन ठाकूर ,राजासिंग ठाकूर ,संदीप ताजी, यांची उपस्थिती होती.
नागेश बेनिवाल या वेळी म्हणाले की, विक्रम काबरे यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत मानाचे स्थान पटकावत समाजाचा मान उंचावल्या बद्दल त्यांना अ. भा. क्षञिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभु श्रीराम चंद्रांचे वंशज अनिल राजा राजेंद्र सिंह व राष्ट्रीय सचिव सर्वेंद्र सिंह चौहाण यांच्या सूचनेनुसार क्षञिय युवा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा प्रदेश महामंञी नागेश बेनिवाल यांनी केली. कार्यक्रमास क्षञिय राजपूत समाज बांधवांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *