ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पुण्याच्या फॅशन शो मध्ये जालन्याच्या अक्षय महाजनची नेत्रदीपक कामगिरी

December 20, 202112:06 PM 65 0 0

जालना / राज्यातील सर्वात मोठ्या फॅशन शो मिस्टर -मिस इलिगंट आयकॉन महाराष्ट्र स्पर्धेत जालन्याच्या अक्षय महाजनने नेत्रदिपक कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीहि त्याने अनेक राज्यस्तरीय फॅशन शो मध्ये त्यांनी सहभाग घेऊन नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पुणे शहरातील नामांकित मॉलमध्ये 12 डिसेंबर रोजी या शोचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत राज्यातील मुंबई ,पुणे, नाशिक व औरंगाबाद सारख्या महानगरातील 50 पेक्षा जास्त तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे 2016चा मिस्टर वर्ल्ड चा विजेता ठरलेले रोहित खंडेलवाल या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर ग्लॅम इंटरनॅशनल इंडोनेशिया 2019 चे विजेते रोहित शिंदे यांच्या देखील यावेळी उपस्थिती होती. पूजा रेड्डी, स्नेहल रहाणे, डॉ. शोएब यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. अंजली जंगम यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी देखील आपली हजेरी लावली होती .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *