ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे  जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा

September 1, 202112:47 PM 13 0 0

उरण (संगिता  पवार ) येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरण  सेंटर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी  उत्सव साजरा करण्यात आला . प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय च्या प्रमुख राज योगिनी तारा दीदी यांच्या प्रेरणेने सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला . प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरणच्या प्रमुख  ब्रहाकुमारी  डिम्पल लक्ष्मण सेवक  यांनी जन्माष्टमी चे आध्यत्मिक महत्व सांगितले .श्री कृष्णा ची आरती करून दही हंडी फोडली  सर्वांना प्रसाद वाटण्यात आला .त्याच प्रमाणे सर्वांनी रास गरबा सादर केला .

या प्रसंगी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरणच्या प्रमुख  ब्रहाकुमारी  डिम्पल लक्ष्मण सेवक,भाग्यवंती माता , पिंकी बहेन ,बीके. मंजू ,बीके सिता ,बीके प्रियंका ,बीके वर्षा ,बीके हरदेश गौर ,बीके बन्नी ,भव्य गुर्जर ,काजल गुर्जर ,पूनम वैष्णव ,ज्ञानदिप तिवारी  आदी उपस्थित होते . .

उरण शहरातील कामठा येथील श्री राधा कृष्ण मंदिरात आरती करून पाळणा घेण्यात आला.सर्वांनी दर्शन घेतले .

नागरिकांनी आपल्या घरीच पूजा करून पाळणा गाऊन उत्सव साजरा केला .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *