ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जासई गव्हाण रस्त्याची तातडीने होणार दुरुस्ती

September 14, 202112:52 PM 2 0 0

उरण ( संगिता पवार ) : जासई गव्हाण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग व सिडको यांच्या कात्रीत सापडले असतांना या रस्त्याबद्दल अनेक तक्रारी करून सुद्धा हा रस्ता होत नव्हता. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता दाट आहे. यावर रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी अधिकाऱ्यांशी या रस्त्याच्या कामाविषयी विचारणा केली.


वास्तविक पाहता या विभागात सिडकोने शंभर टक्के भु-संपादन केलेले आहे. सिडकोचे अनेक प्रकल्प या विभागात सुरू आहेत. न्हावा शिवडी सी लिंक, मास हाऊसिंग प्रकल्प
विमानतळ, नेरुळ उरण रेल्वे मार्ग असे अनेक प्रकल्प या ठिकाणी चालु आहेत. त्यामुळे या रस्त्यांची शंभर टक्के दुरुस्ती करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. यासाठी महेंद्र घरत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दूरधनी करून परिस्थिती सांगितली.
हा रस्ता लवकरात लवकर सिडकोकडे हस्तांतरित करावा अशी मागणी केली. त्याच बरोबर सिडको चे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्याशी चर्चा करून गणपतीला अवघे एक दिवस शिल्लक असतांना तातडीने या रस्त्याची डागडुजी करण्यास सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *