ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

September 28, 202115:25 PM 15 0 0

नवोदय विद्यालय निवड समिती समिती मार्फत 11 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय निवड पात्रता परीक्षेत पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीराम तांडा शाळेने यश प्राप्त केले आहे.

नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत श्रीराम तांडा शाळेतील दर्शन जनार्दन राठोड या विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालय अंबा तालुका परतुर जिल्हा जालना या विद्यालयात इयत्ता सहावी वर्गासाठी निवड झाली आहे. यावर्षी कोरोना महामारी मुळे शाळा बंद असताना देखील ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी व सराव घेण्यात आला होता. तसेच तसेच जवळपास 150 सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचेच फळ म्हणून दर्शन जनार्दन राठोड होतकरु विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे. त्याबद्दल दर्शनचे केंधळी केंद्रातर्फे व श्रीरामतांडा शाळेचे मुख्याध्यापक श्री जगदीश कुडे, वर्गशिक्षक श्री अविनाश लोमटे सर, शेळके मॅडम, दुभळकर मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे
सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *