नांदेड:- जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च विद्यालय बरबडा येथील शैक्षणिक वर्ष 1989 मधील सर्व माजी विध्यार्थी यांनी नांदेड येथील हॉटेल राजयोग येथे हा स्नेहसंमेलन मेळावा आयोजन केला. या कार्यक्रमात जवळपास 45 स्नेही उपस्थित होते मला (एन एम तिप्पलवाड एन टी सर) या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं मी हा सोहळा बघून भारावून गेलो.
खरं तर मी त्यांचा वर्गमित्र नाही मी 1990 च्या ब्याचचा विध्यार्थी आहे पण माझा सहवास हा या 1989 च्या ब्याचच्या मित्रांसोबत जास्त होता म्हणूनच ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारा सर्वांचा आवडता आणि माझा प्राणप्रिय मित्र सुदाम तोडे यांनी त्यांच्या हॉटेल राजयोग मध्ये हा कार्यक्रम घडवून आणण्याचा योग आणला त्यांचं करावं तेव्हडे कौतुक कमी आहे तसेच गजानन पापंटवार, माधवराव रेडेवाड, बालाजी पापंटवार, अरुण पापंटवार, अरुण भुसलवाड यांनी अथक परिश्रम घेऊन सर्व माजी विध्यार्थी याना मैत्रीच्या एका धाग्यात विणण्याचे काम अवघ्या 1 महिन्यात केले.या मध्ये बरेच विध्यार्थी शासकीय पदावर अधिकारी म्हणून आपलं कार्य करत आहेत काही प्राध्यापक, शिक्षक, काही शेतकरी,तर काही खाजगी कंपनी मध्य तर काही राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत या सर्वांचा राजयोग हॉटेलचे मालक सुदाम पाटील तोडे यांनी वैयक्तिक शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमात काही निवडक विध्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले व बालपणी च्या आठवणीना उजाळा दिला नि सर्व जण काही वेळापूरते बालक होऊन शेवटी झिंगाट या गाण्यावर काळजाचा ठेका धरत आपल्या चेहऱ्यावर हावभाव करत आनंदोत्सव साजरा केला. आणि शेवटी हॉटेल राजयोग तर्फे सर्वांना स्नेहभोजनाची मेजवाणी दिली.सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व नंतर विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली व या बैठकीत पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली.
Leave a Reply