ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विविध संघटना, संस्थांकडून जयंती ढवळे यांचा सत्कार

June 21, 202216:05 PM 30 0 1

नांदेड – येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची सुकन्या जयंती ढवळे हिने नुकताच जाहीर करण्यात आलेल्या एस.एस.सी‌. बोर्ड परीक्षेत ९७.२० टक्के घेऊन सुयश मिळवल्याबद्दल विविध सामाजिक संघटना तथा सेवाभावी संस्थांकडून जयंती ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. सप्तरंगी साहित्य मंडळ, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ, आकाश प्रकाशन युट्युब चॅनल, पद्मांकुर सेवाभावी संस्था, पूनम प्रकाशन, पीएचडी धारक शिक्षक संघटना, शिक्षक सेना, युगसाक्षी साहित्य सभा, सत्यशोधक फाऊंडेशन, बहुजन शिक्षक परिषद, आंबेडकरी साहित्य संसद आदी सामाजिक तथा सेवाभावी संस्थांकडून जयंती ढवळे यांना शाल, पुष्पहार, बुके, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

शहरातील मंत्री नगर भावसार चौक परिसरातील लिटल स्काॅलर्स पब्लिक स्कूलमधून जयंती ढवळे हिने ९७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या तिच्या यशाबद्दल पांडूरंग गर्जे, रुपाली गर्जे, डॉ. हेमंत कार्ले, डॉ. दीक्षा वाघमारे, भैय्यासाहेब ढवळे, रंजिता सोनकांबळे, शामराव वाघमारे, वत्सलाबाई वाघमारे, शरदचंद्र हयातनगरकर, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, रणजीत गोणारकर, सविता वाघमारे, मारोती कदम, संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार, प्रशांत गवळे, आम्रपाली मादळे, मैत्री वाघमारे, शंकर गच्चे, वसंत वाघमारे, माया वाघमारे, प्रतीक्षा वाघमारे, राहुल वाघमारे, सीमा वाघमारे, अबोली वाघमारे, पूनम वाघमारे, परी वाघमारे, युवराज ढवळे, पंचफुला वाघमारे, परी ढवळे, मिष्टी ढवळे आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर सोशल मीडियावर अनेकांनी जयंती ढवळेच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *