नांदेड- येथील अखिल भारतीय जिवा सेना व जिवा सेना कर्मचारी महासंघाच्या वतीने संत सेना महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गाजेवाड यांची तर प्रमुख उपस्थिती म्हणून जीवा सेना महासंघाचे प्रदेक्षाध्यक्ष लक्ष्मण कोंडवार, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल गायकवाड, महानगर अध्यक्ष बाळासाहेब पवार, पिछडा शोषित संघाचे उपाध्यक्ष सतीशचंद्र शिंदे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र शाखा नांदेडच्या जिल्हाध्यक्षपदी साहित्य चळवळीत अग्रेसर असलेले तथा पत्रकार रणजित गोणारकर यांची तर स्तंभलेखिका रुपाली वैद्य वागरे यांची राज्य कार्यकारिणीवर महिला समन्वयक म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे महासचिव पांडुरंग कोकुलवार यांनी दिली. ही निवड करण्याचा निर्णय नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
संत सेना महाराज जयंतीचे औचित्य साधून ८ मार्च रोजी जीवा सेना आणि अखिल भारतीय जीवा सेना कर्मचारी महासंघाच्या व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित कौठा येथील सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात गोविंद बामणे – उपाध्यक्ष, लक्ष्मण लिंगापुरे – सचिव, भीमराव ढगारे- कोषाध्यक्ष, दिगंबर श्रीकंठे, रविराज भद्रे – कार्यकारिणी सदस्य अशी निवड करण्यात आली व कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद बामणे यांनी केले तर आभार सतिश शिंदे यांनी मानले.
Leave a Reply