ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रा.सारिका बकवाड यांना जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार जाहीर

February 16, 202214:38 PM 30 0 0

नांदेड (प्रतिनिधी) :  जिजाऊ सावित्री जयंती महोत्सवानिमित्त दैनिक स्वराज्य व आझाद ग्रुप च्या वतीने गौरव जिजाऊ सावित्रीच्या लेकीचा या उत्सवामध्ये त्यांच्या कार्याविषयी आधारित लेख प्रकाशित करण्यात आले. त्या कर्तुत्ववान माता-भगिनींना जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई पावडे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर, नांदेड जिल्हा परिषद चे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या उपकार्यकारी मुख्याधिकारी रेखाताई कदम, नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक तथा बाल रोग तज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, यासह प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते प्रा.सारिका बकवाड यांना जिजाऊ सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नांदेड शहरातील एमजीएम जवळ नमस्कार चौक येथे असलेल्या हॉटेल गणराज पॅलेस येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक आझाद ग्रुपचे अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे व दैनिक युवाराज्य चे आवृत्ती संपादक तथा एकलव्य निवासी होस्टेल चे संचालक प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे…

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *