ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गोवठणे गावचे जितेंद्रबुवा म्हात्रे रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित

March 13, 202212:15 PM 36 0 0

उरण(तृप्ती भोईर) : गोवठणे गावचे सुपूत्र जितेंद्र अनंत म्हात्रे ह्यांना नुकतेच रायगड जिल्हापरिषदेने’रायगड भूषण’ ह्या पुरस्काराने अभिभूत केले आहे.रायगड जिल्हापरिषद कला,क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक, आध्यत्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना दरवर्षी रायगड भूषण हा पुरस्कार देऊन गौरवान्वित करते. गुण ग्राहक जितेंद्र म्हात्रे ह्यांना संगीत क्षेत्रातील विशेष योगदानासाठी ह्या वर्षीचा रायगड भूषण हा पुरस्कार हा प्राप्त झाला आहे. अभिजात संगीताची आवड असलेले जितेंद्र म्हात्रे ह्यांनी प्राथमिक संगीत शिक्षण आपल्या वडिलांकडून घेऊन संगीत कलेची वाटचाल सुरू केली.प्रख्यात गायक शंकरबुवा म्हात्रे आणि निवृत्ती बुवा चौधरी या गुरूकडून मार्गदर्शन घेऊन संगीत कलेत आपले नाव कोरले.
जितेंद्रबुवा यांनी आतापर्यंत भजन,अभंगवाणी,नाट्यगीत,भावगीत,सुगमसंगीताचे सर्वश्रुत असे कार्यक्रम मुंबई-नवी मुबंईत केले आहेत.अनेक सामाजिक,सांस्कृतिक, व सेवाभावी संस्थामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले आहे. मराठी वाहिनीवर त्यांनी भजन कला सादर केली आहे.अनेक नाटकामध्ये संगीतकार म्हणून कार्य केले आहे.अनेक भजन मंडळांना स्वर, लय,ताल या नावाने अनेक शिष्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. उरण भूषण,समाज भूषण,आदर्श शिक्षक असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कोणत्याही कार्यातील नियोजन बद्धता व अंमलबजावणी ही वाखाणण्याजोगी आहे.कोणतेही हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी ते पराकोटीचे प्रयत्नशील राहतात.
रायगड भूषण पूरस्कृत जितेंद्र बुवा म्हात्रे यांनी कृतज्ञता म्हणून सहकुटूंब जिल्हाप्रमुख मा. आमदार मनोहर शेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेतली.त्याचवेळी मा. आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करून शुभा- शिर्वाद दिले.
रायगड भूषण जितेंद्र म्हात्रे यांनी संगीतक्षेत्रात अधिकाधिक व्यापकता निर्माण करून,सरस्वती सेवा करून अनेक चांगले शिष्य घडवून आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करू हे वक्तव्य व्यक्त केले.यावेळी शिक्षक सेनेचे प्रमुख कौशिक ठाकूर आणि शिक्षसेवावर्ती महेश गावंड हे उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *