ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेकडून मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

July 13, 202216:04 PM 18 0 0

उरण (संगिता  पवार ) : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेकडून    शनिवार( दि. ९ ) रोजी जे.एम. म्हात्रे प्राथमिक व माध्यमिक  शाळा,मोरा – उरण या शाळेतील पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी अशा  गरीब गरजू  विद्यार्थ्यांना  चालू शैक्षणिक वर्षी जे.एम. म्हात्रे  संस्थेमार्फत   250 गणवेशाचे वाटप   करण्यात आले.
जे. एम. म्हात्रे संस्थेचे संस्थापक. जे. एम. म्हात्रे (भाऊ) व संस्थेचे अध्यक्ष मा. प्रीतम म्हात्रे, संस्थेचे सचिव मा. जयवंत मढवी  यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात  आले.
                  या गणवेशांचे  वाटप करण्यासाठी जे.एम.म्हात्रे संस्थेचे सचिव मा. जयवंत मढवी, श्री.अजय कुंभार, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मा. श्री जैवेंद्र कोळी, शाळा समिती चेअरमन मा. पी.एम कोळी, मा. चंद्रकांत कोळी,  मा. दिलीप मुंबईकर, श्री. आर के पाटील, श्री. सत्यवान ठाकूर   यांच्या हस्ते  गणवेशाचे  वाटप करण्यात आले.  मा. जयवंत मढवी  यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सांगितले की शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये नक्कीच सुधारणा करू   तुमची शैक्षणिक प्रगती वाढवी हीच आमची अपेक्षा तसेच प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. साईनाथ गावंड  यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय जे.एम. म्हात्रे( भाऊ) व संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या मोरा गावामध्ये शाळेसाठी भव्य दिव्य इमारत उभी केली आहे. या शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची    शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामुळे मुलांचे मनोबल वाढते तसेच मुले शिक्षणापासून वंचित राहत नाहीत व शिक्षणाची जीवन ज्योत अखंड तेजोमय ठेवण्याचे काम जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने   केल्याबद्दल  त्यांचे आभार व्यक्त केले . माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय सुधीर मुंबईकर यांनी आपल्या मनोगतातून शालेय प्रगती संदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
https://youtu.be/MdaJZ1AjInc
      या प्रसंगी सचिव जयवंत मढवी, उपनगराध्यक्ष श्री. जैवेंद्र कोळी,  माध्यमिक शाळेचे चेअरमन श्री.पी. एम. कोळी, प्राथमिक शाळेचे चेअरमन  श्री. चंद्रकांत कोळी, इंग्रजी शाळेचे चेअरमन श्री. दिलीप मुंबईकर,  शाळा समिती सदस्य श्री.आर. के पाटील, श्रीमती. राजश्री कोळी, श्री.सत्यवान ठाकूर,    प्रभारी मुख्याध्यापक श्री. साईनाथ  गावंड, सहाय्यक शिक्षक श्री. सुगिंद्र म्हात्रे,श्री. अनिल पाटील, स्वप्निल नागमोती, शिंदे मॅडम, घरात मॅडम, सौ सुनीता पाटील , सौ. राणी कदम, सौ.सुप्रिया मुंबईकर ,   माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधिर मुंबईकर
 विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमा ची सजावट श्री.घनश्याम म्हात्रे व दिनेश पाटील यांनी केली. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले   आभार  सहाय्यक शिक्षक मनोज म्हात्रे यांनी करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *