ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

‘ग्रीन पोर्ट’ बनण्यासाठी जेएनपीटीने सुरू केला इलेक्ट्रिक वाहनांचा वापर -जेएनपीटी बनले ई-वाहनांचा वापर करणारे देशातील पहिले प्रमुख बंदर

August 5, 202120:10 PM 81 0 0

उरण प्रतींनिधी (संगिता पवार) मुंबई, 05 ऑगस्ट, 2021 : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील कंटेनर हाताळणी करणारे एक प्रमुख बंदर आहे. सुरवातीपासूनच जेएनपीटी आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये शाश्वत विकास कार्यासाठी प्रयत्न करीत आहे. ग्रीन पोर्ट (हरित बंदर) उपक्रमांतर्गत व शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून जेएनपीटीने आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये 9 इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. या वाहनांचा वापर मुख्यत: बंदराच्या प्रचालन क्षेत्रामध्ये कामगारांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी प्रवास करण्यासाठी केला जाणार आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. यांनी आज या इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन केले. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. व सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. 

विद्युत वाहनांचा वापर हे जेएनपीटीच्या ‘ग्रीन पोर्ट’ उपक्रमाशी सुसंगत असून जेएनपीटीने आपल्या  कर्मचाऱ्यांसाठी एक पर्यावरण अनुकूल वाहतूक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे बंदराच्या शाश्वत व हरित उपक्रमांच्या यादीमध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. ई-वाहने ही शून्य-उत्सर्जन वाहने असल्याने यांच्या वापारामुळे जेएनपीटी हरित व ऊर्जा-कार्यक्षम वाहतुक पर्याय निर्माण करण्यास सक्षम बनेल. जेएनपीटीने या नवीन ई-वाहनांसाठी एक डेडिकेटेड चार्जिंग स्टेशन देखील कार्यान्वित केले आहे.

ई-वाहनांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, ” बंदराच्या कामकाजाचा बंदर परिसरातील पर्यावरण व आसपासच्या समुदायांवर कमीत-कमी प्रभाव होईल यासाठी जेएनपीटीने सातत्याने शाश्वत उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. जेएनपीटीचे उद्दिष्ट केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न होने नसून पर्यावरणीय आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त करणे हे सुद्धा आपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जगभरातील उद्योग पर्यावरणदृष्ट्या जागरूक विश्वाप्रति आपली जबाबदारी ओळखुन आपल्या कामकाजामध्ये हवामान बदलाचे नवनवीन उपाय समाविष्ट करत आहेत. ई-वाहनांचा देखभालीसाठीचा खर्च कमी असून यांच्या वापरामुळे नैसर्गिक इंधनावरील खर्च व अवलंबित्व कमी होईल. ई-वाहनांचा वापर सुरू केल्याने आता जेएनपीटीचे स्थान जगातील प्रमुख कंटेनर बंदरांपैकी शाश्वत जागतिक बंदरांच्या बरोबरीचे झाले आहे. भविष्यात सुद्धा आम्ही स्वच्छ, हरित आणि शाश्वत बंदर निर्मितिसाठी प्रयत्नशील राहू. ”

जेएनपीटीने सीवेज ट्रीटमेंट प्लांट, टग्स/पोर्ट क्राफ्ट्सना किनाऱ्यावर वीज पुरवठा, सतत परिवेशी वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्र, व्यापक घनकचरा व्यवस्थापन सुविधा, ई-आरटीजीसी, ऑइल स्पिल रिस्पॉन्स (ओएसआर) सारख्या विविध पर्यावरणीय सुधारणा सुविधा व ग्रीन पोर्ट उपक्रम सुरू केले आहेत. जेएनपीटीने स्वत:च्या तसेच खाजगी टर्मिनल्सच्या सार्वजनिक इमारतींच्या छतावर सुमारे 2.3 मेगावॅटचे सौर पॅनेल देखील स्थापित केले असून बंदर परिसरात एलईडी दिवे देखील लावण्यात आले आहेत यामुळे उर्जेचा वापर व कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. जेएनपीटी पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय लक्ष्य (ईएसजी) प्राप्त करण्यासाठी ‘ऊर्जा व संसाधन संस्थे’  (टीईआरआय) च्या माध्यमातून शाश्वतेचा अभ्यास देखील करत आहे.

केवळ आर्थिकदृष्ट्या सपन्न होने हे आमचे उद्दिष्ट नसून पर्यावरणीय आणि सामाजिक स्थिरता प्राप्त करने हे देखील आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशाप्रकारे भविष्यात देखील पर्यावरण संरक्षण हा जेएनपीटीच्या नियोजन व कामकाजाचा एक अविभाज्य घटक असेल.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *