ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जेएनपीटी बंदरात साजरा झाला ‘स्वच्छता पखवाडा’ ‘स्वच्छता पखवाडा’ अभियाना दरम्यान स्वच्छ व हरित बंदर मोहिमेस चालना देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी राबविले विविध स्वच्छता उपक्रम –

October 5, 202113:05 PM 42 0 0

उरण(संगिता पवार) 04 ऑक्टोबर, 2021 : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी हे कंटेनर हाताळणी करणारे देशातील एक प्रमुख बंदर आहे. स्वच्छ व हरित भविष्यासाठी जेएनपीटी बंदरात ‘स्वच्छता पखवाड़ा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘स्वच्छता पखवाड़ा’ दरम्यान कोविड-19 संबंधी सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्यात आले. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से., यांनी बंदर कर्मचा-यांना हरित आणि शाश्वत भविष्यासाठी “स्वच्छता प्रतिज्ञा” देऊन स्वच्छता पखवाड्याचा आरंभ केला होता. यावेळी बंदराचे उपाध्यक्ष श्री उन्मेश शरद वाघ, भा.रा.से. आणि सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


बंदरामध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचा मुख्य उद्देश्य बंदरातील कर्मचारी व भागधारकांना बंदर क्षेत्र स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी जागरूक करून ‘स्वच्छ भारताचे’ उद्दिष्ट साध्य करने आहे. बंदरातील कामगार वसाहत, हॉस्पिटल, गेस्ट हाऊस, बल्क ऑफिस परिसर, प्रशासन भवन, मुख्य जेट्टी परिसर, लँडिंग जेट्टी, आयसीडी ऑफिस, बीपीसीएल ऑफिस, द्रव कार्गो जेट्टी, रस्त्यालगतचा परिसर आणि बंदर परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. यांनी बंदर तसेच आसपासच्या परिसरातील स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. त्यांनी बंदर व आसपासच्या परिसरात स्वच्छता राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा-या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवेचा विशेष संदर्भ देत ‘स्वच्छ आणि हरित बंदर’ चे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. जेएनपीटीने लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘स्वच्छ भारतचा संदेश’ देणारे बॅनर व साइनबोर्ड विविध ठिकाणी प्रदर्शित केले आहेत. यासोबतच कामगारांसाठी निबंध लेखन, नारा लेखन सारख्या विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. बंदरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने व सक्रिय सहभाग घेतला. 02 ऑक्टोबर 2021 रोजी गांधी जयंती दिनी स्वच्छता अभियानाचा समारोप झाला. जेएनपीटी सम्पूर्ण बंदर परिसरामध्ये नियमितपणे योग्य साफसफाईचे कार्य करीत आहे. त्याचबरोबर स्वच्छ आणि शाश्वत बंदर निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्नशील राहून सामाजिकदृष्ट्या एक जागरूक आस्थापनेचा आपला नावलौकिक भविष्यातही कायम ठेवेल.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *