ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओबीसी विशाल मोर्च्यात शामिल व्हा- सतिष वाहुळे

January 22, 202120:13 PM 122 0 0

जालना( प्रतिनिधी)जालना शहरात येत्या 24 जानेवारी 2021, रविवार रोजी शहरातील शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणाऱ्या ओबीसी, एनटी, व्हिजेएनटी, एसबीसी समाजाच्या मोर्चाला भिम शक्ती सामाजिक संघटना जिल्हा जालनातर्फे जाहिर पाठिंबा देण्यात आला. देशात आणि महाराष्ट्रात जनगणना अभियान सुरु होणार असून, एससी, एसटी प्रवर्गांच्या जनगणनेप्रमाणेत ओबीसी प्रवर्गाचीही जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी ओबीसी मोर्चा काढण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील उपेक्षीत समाजाला त्यांचे न्याय हक्क प्रदान करण्याच्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेत सर्वांच्या हिताचा विचार केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एससी,एसटी या समाजाला हक्क प्रदान केले नसुन प्रामुख्याने या देशातील फार मोठा वर्ग असलेला आणि सुक्ष्म जातीमध्ये विभक्त झालेल्या ओबीसी समाजाला ही न्याय देण्याच्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेत 340 कलम लिहून या समाजाच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या केल्या आहेत. वास्तविक पाहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एस.सी., एस.टी साठी असलेल्या 341 कलमापुर्वी ही तरतुद करुन ठेवली आहे. डॉ.बाबासाहेब अंाबेडकर विचाराने चळवळ चालणाऱ्या भिमशक्ति सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या माध्यमातून सदरील ओबीसी विशाल मोर्चाला जाहीर पाठींबा देण्यात येत आहे.
या विशाल मोर्चात भिमशक्तीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र सरचिटणीस प्रमोद रत्नपारखे, जिल्हा कार्याध्यक्ष सतिष वाहुळे, मराठवाडा उपाध्यक्ष भास्कर साळवे, मराठवाडा सरचिटणीस संजय भालेराव, जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, राजीव पारखे, समाधान रत्नपारखे, सुनिल नावकर, मिलींद हिवराळे, शेखर लोखंडे, अरुण सोनवणे, दिनकर बनसोडे, रमेश दाभाडे, सुधाकर इंगळे आदींनी केले आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *