ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

23 जुलै हा जगण्याचा दिवस म्हणून साजरा करणार -हेमलता पाटील

July 24, 202115:24 PM 64 0 1

उरण (अश्विनी धोत्रे) ः सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल या होत्या, त्यांचा दि. 23 जुलै रोजी स्मृती दिन असून हा स्मृती दिन जगण्याचा अधिकार दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. डाव्या संघटनेच्या वतीने हा दिवस जाहीर करण्यात आला आहे. असे प्रतिपादन जनवादी महिला संघटनेच्या हेमलता पाटील यांनी केले.


अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने कामगार भवन, बोकडवीरा येथे दि. 23 जुलै रोजी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, सरकारने जनतेला त्रास देणे थांबवावे, सरकारी विभागातील सर्व नोकरभरती ही एमपीएससी मार्फत करण्यात यावी, केंद्र व राज्य सरकारने सरकारी नोकरभरतीवरील बंदी उठवावी, रिक्त जागा तात्काळ भराव्यात, गरीब व सामाजिक दृष्ट्य मागास विद्यार्थ्यांची शैक्षणीक फि माफ करावी. विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातुन काढून टाकणार्‍या शाळा आणि संस्थांच्या परवानग्या रद्द कराव्यात. सर्वांना मोफत व सार्वत्रीक लस मिळाली पाहीजे, लसीकरणासाठी मदतकेंद्र उभारुन लस देण्याची प्रक्रीया सुलभ करण्यात यावी, सार्वजनीक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी पुरेशा निधीची तात्काळ तरतुद करावी, रेशन दुकानामार्फत प्रति युनीट 10 किलो प्रमाणे धान्य व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात यावा, आयकर लागू नसलेल्या कुटुंबांच्या खात्यावर दर महा 7500 रुपये जमा करण्यात यावेत, नवी मुंबई विमानतळ व इतर प्रकल्पामध्ये नोकरीची हमी देण्यात यावी, शेतकर्‍यांच्या जमीन संपदनात शेतकर्‍यांची होणारी फसवणूक तात्काळ थांविण्यात यावी या व इतर महत्वाच्या मागण्या जनवादी महिला संघटनेच्या आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या हेमलता पाटील, ज्योती म्हात्रे, अमिता ठाकूर, दिनेश म्हात्रे, राकेश म्हात्रे यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *