ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सेवापुर्ती निमित्त जंबो निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

December 31, 202016:45 PM 103 0 0

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाचन वडगाव अंतर्गत येणाऱ्या शाळा येथील केंद्रप्रमुख मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी आणि सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी यांच्या सेवापुर्ती निमित्त प्राथमिक शाळा आंबेवाडी येथे 30 डिसेंबर 2020 रोजी सेवापुर्ती निमित्त जंबो निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जालना तालुक्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती गीता नाकाडे या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय जाधव शिक्षण विस्तार अधिकारी कारला बीट, तालुका गटसमन्वयक श्री पी आर जाधव हे होते. श्रीमती नाकाडे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी जालना तालुका गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेतल्याबद्दल समस्त शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पहाराने करण्यात आले या निरोप समारंभाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती गीता नाकाडे गटशिक्षणाधिकारी जालना ह्या अध्यक्षपदी होत्या. केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक आणि महिला शिक्षिका, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्याहस्ते सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणधिकारी यांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला आणि त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या सेवानिवृत्त सत्कार मूर्ती मध्ये सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा कारला बीट चे विस्तार अधिकारी श्री विठ्ठल जायभाये, केंद्रीय प्राथमिक शाळा पाचन वडगाव येथील केंद्रप्रमुख श्रीमती शशिकला केतकर, केंद्रीय मुख्याध्यापक म.नईम म.बशीर, प्राथमिक शाळा येथील माजी मुख्याध्यापिका श्रीमती लता चव्हाण, प्राथमिक शाळा पोकळ वडगाव येथील मुख्याध्यापिका शेख मॅडम यांचा समावेश होता.
याप्रसंगी केंद्रीय प्राथमिक शाळा पाचनवडगाव प्रभारी केंद्रप्रमुख अनंतकुमार शिलवंत आणि प्रभारी मुख्याध्यापक मंगलसिंग धनावत यांचे स्वागत प्रभार स्वीकारल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच मराठवाडा नाभिक सेवा संघाच्या कर्मचारी मराठवाडा अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर गिराम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांबद्दल ओम देशमुख, सीमा बदर, मंगलसिंग धनावत यांनी मनोगत व्यक्त केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.तसेच मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी पाचनवडगाव केंद्रातील,अंतर्गत शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
फोटो कॅप्शन: निरोप समारंभ कार्यक्रमात डावीकडून श्री पी.आर. जाधव, श्रीमती शशिकला केतकर, श्री व्ही डी जायभाये, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे, श्रीमती लता चव्हाण, म नईम म. बशीर, केंद्रप्रमुख अनंतकुमार शीलवंत, मंगलसिंग धनावत इत्यादी दिसत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *