ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मौजपुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती भागवत राऊत तर उप सरपंचपदी आप्पासाहेब डोंगरे

February 15, 202121:16 PM 41 0 0

जालना (प्रतिनिधी)  जालना तालुक्यातील मौजपुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर सौ. ज्योती भागवत राऊत यांची तर उपसरपंचपदी आप्पासाहेब डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या निवडीचे गावकर्‍यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल 18 जानेवारी रोजी लागला होता. त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक ही दि. 12 फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुखदेवे यांची तर त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रविण पवार यांची उपस्थिती होती.

निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच पदासाठी इच्छूकांचे अर्ज मागवण्यात आले. यावेळी सौ. ज्योती भागवत राऊत यांचा एकच अर्ज आला तर उपसरपंच पदासाठी आप्पासाहेब डोंगरे यांचा एकच अर्ज आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध पार पडली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य सत्यनारायण ढोकळे, बद्रीनारायण भसांडे, संतोष मोरे, मिरा गायकवाड, लता काळे, सविता जाधव, मनिषा डोंगरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या निववडीचे माजी सरपंच निवृती गायकवाड, माजी उपसरपंच नारायण डोंगरे, प्रभाकर डोंगरे, सर्जेराव डोंगरे, नारायण गायकवाड, राम डोंगरे, राधाकिसन काळे, अच्युत मोरे, बालाजी बळप, बळीराम गायकवाड, अंकुश काळे, दत्ता काकडे, बंडू डोंगरे, कृष्णा हिवाळे, सुरेष देशपांडे, शेख वसीम, किसन काळे, रामदास गायकवाड आदींनी स्वागत केले.

पद मिळणे आणि विकास कामाला सुरुवात करणे सोबतच
मौजपुरी येथे गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई असते. ही समस्या दुर करण्यासाठी मौजपुरी येथील तरुण अग्रही होते. त्यांनी बहुमताने सार्वत्रिक निवडणूकीत विजय मिळवला असल्याने त्यांनी गावाचा कायापालट करण्यासाठी सुरुवात केली आहे. पदाची माळ गळ्यात पडताच पिण्याच्या पाण्याची समस्या दुर करुन गावात शुध्द फिल्टरचे पाणी देण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून गावात फिल्टर आणले होते, परंतु ते बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण होती. अखेल फिल्टरच्या शेडच्या कामाचे उद्धाटन झाले असून शिवरात्रीपर्यंत फिल्टर प्लॅन्ट सुरु होणार असून गावकर्‍यांना पिण्याचे शुध्द पाणी मिळणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *