ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वर्ल्ड रेकॉर्ड कवी संमेलनात ज्योती शिंदें यांचा सहभाग

July 18, 202114:35 PM 10 0 0

सातारा प्रतींनिधी (विदया निकाळजे) : ११ जुलै ते 16 जुलै 2021 पर्यंत सुमारे 150 तास अविरत सुरू असणाऱ्या महाकवी संमेलनात ज्योती शिंदे यांनी अप्रतिम हिंदी गझला सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने तर जिंकलीच शिवाय जगभरात आपल्या भारत देशाचे नाव उंचावले आहे शिवाय पश्चिम महाराष्ट्रातून आपले नेतृत्वही केले आहे.

या महाकवी संमेलनात जगभरातील सुमारे 700 कवींनी सहभाग नोंदवला होता.अमेरिका, कॅनडा,बेल्जियम, सौदी अरेबिया,कॅलिफोर्निया,जर्मनी, दुबई ,सिंगापूर इ. देशातील स्पर्धक त्यात सहभागी झाले होते. या कवी संमेलनाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लवकरच नोंद होणार आहे असे आयोजकांनी सांगितले. ज्योती शिंदेंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . रोहा ,रायगड चे नाव जागतिक स्तरावर नेऊन त्यांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.त्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *