ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चालू असलेल्या बोगस कामाची चौकशी करावी वंचितचे कैलास रत्नपारखे यांचे विभागीय आयुक्ताकडे निवेदनाव्दारे मागणी?

March 20, 202115:06 PM 29 0 0

जालना (प्रतिनिधी) ः नुतन वसाहत भागातीत प्रभाग 28 मध्ये दतित वस्ती सुधार योजना अंतर्गत चालू असलेल्या बोगस कामाची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नुतन वसाहत येथील प्रभाग क्र. 28 मधील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चालू असलेल्या बोगस कामाच्या चौकशी बाबत जालना नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दि. 8/9/2020 रोजी लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. परंतू त्यावर कोणतीही कार्यवाही नगर परिषद प्रशासनाने केलेली नाही, त्यामुळे पुन्हा 1/10/2020 मा. जिल्हाधिकारी मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना यांच्याकडे तक्रार दिली होती. तसेच उपोषण करणे बाबत सुचविले होते.

परंतू त्यावरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दि 1/10/2020 च्या पत्रात नमुद केल्या प्रमाणेदि 14/10/2020 रोजी उपोषण सुरु केले असता मा. जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त. समाज कल्याण व मा. जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले व उपोषण थांबविले. परंतू सदर आदेशानुसार सुद्धा मुख्याधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही, बोगस कामाबाबत अनेक संघटनांनी तक्रार केलेल्या आहेत, तसेच वर्तमानपत्रातही त्यासंदर्भात बातम्या प्रकाशित झालेल्या होत्या.असे असतांनाही मुख्याधिकार्‍यांनी कोणतीही दखल घेतलली नाही. नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे?स्वतः गुत्तेदारीमध्ये भागीदारीने काम करत आहेत. त्यामुळेच त्या तक्रारीची दखल घेत नाहीत असा आरोपही निवेदनाच्या माध्यमातून श्री रत्नपारखे यांनी केला आहे. प्रभाग 28 मध्ये पाईप खालीवर असल्यामुळे पाईपची तोंडे तुडूंब तुंबलेली आहेत. हे काम निकृष्ट झाल्यामुळे काही दिवसात चॉकअप होण्याची शक्यता आहे. तसेच लहुजी नगर चौक ते ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल येथे नव्याने करण्यात आलेला सिमेंट रोड लोकांच्या राहत्या घरापासून 1 फुट उंच करण्यात आल्यामुळे लोकांच्या घरात नालीचे व पावसाचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. रोडची व अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनच्या समस्त रहिवासी व लोकांनी अनेक तक्रारी ुकेलेल्या आहेत. मुख्याधिकारी, उपअभियंता यांच्यावर निलंंबनाची कारवाई करून बोगस काम करणार्‍या एजन्सीवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकून संबधीतांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जालना शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *