ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कल्पवृक्ष औदुंबर

May 7, 202115:58 PM 23 0 0

औदुंबर धर्मशास्त्रानुसार अतिशय पूजनीय वृक्ष. औदुंबर म्हटले की आपल्या समोर येतात ते ‘श्री दत्तगुरु’. श्री दत्तगुरूंनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी या वृक्षाच्या खाली बसून साधना केली त्यामुळे आमची अशी भावना आहे की या वृक्षाखाली श्री दत्तगुरूंचा वास असतो.

आम्ही खूप श्रद्धेने औदुंबराची पूजा करतो. परंतु आयुर्वेदिक वैद्यांचे मते या औदुंबर वृक्षात आयुर्वेदानुसार खूप आरोग्य संपदा दडली आहे. आजच्या कोरोना महामारीच्या काळात आम्हाला सर्वात जास्त महत्व कळले ते म्हणजे ऑक्सिजनचे, हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. याबरोबरच औदुंबर हा अनेक विकारांवर गुणकारी वृक्ष आहे. या वृक्षाचा प्रत्येक भाग हा गुणकारी आहे साल, पाने, मूळ, फळ तसेच यातून निघणारा दुधासारखा पांढरा द्रव. शरीरातील कफ व पित्त दोषांचे संतुलन ठेवण्यासाठी याचे फळ उपयोगी आहे, सूज कमी करणे, वेदनाशामक, स्त्रियांचे विकार, मधुमेह, दात दुखी, उष्णतेचे विकार अशा कितीतरी विकारांवर आयुर्वेदात याचा औषधी म्हणून उपयोग केला जातो असे उल्लेख आयुर्वेदिक ग्रंथांत दिसतात.

आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने औदुंबर हा कल्पवृक्ष आहे अशा वृक्षाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात,प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्ताने थांबून त्यातील एक प्रकारे ऑक्सिजन व इतर घटकांचा लाभच आमची संस्कृती आम्हाल करून देते

                                                                             डॉ. पी. एस. महाजन, संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *