ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कमला निंबकर बालभवन ची एसएससी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम

June 21, 202215:59 PM 20 0 0

फलटण  (सई निंबाळकर)  – मार्च २०२२ मध्ये झालेल्या इ.10 वी च्या बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात कमला निंबकर बालभवन शाळेने आपली इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उज्ज्वल यश संपादन केले. विशेष म्हणजे या शाळेचे सर्व विद्यार्थी, 71% च्या वर गुण मिळवून यशस्वी झाले आहे. यावर्षी २९ पैकी २६ विद्यार्थी Distinction {75% च्या वर गुण मिळवणारे) त्यातील 23 विद्यार्थी 80% च्या वर गुण मिळवणारे आहेत.

तर त्यातील 11 विद्यार्थी 90% च्या वर गुण मिळवणारे आहेत. प्रथम आलेल्या दोन विद्यार्थीनीना 97.40% गुण प्राप्त झाले आहेत.तर एकीला शासनाचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार,5000/ मिळणार आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव डॉ.मंजिरी निंबकर, अध्यक्ष झिया कुरेशी,विश्वस्त डॉ.चंदा निंबकर,सर्व विश्वस्त, शाळेचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे, प्रियदर्शनी सावंत व इतर पालक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *