कंधार ,जि. नांदेड प्रतिनिधी : तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते भारतीय सैनिकांना शुभेच्छा संदेशाचे विमोचन आज शनिवार दि.२४ जुलै रोजी करण्यात आले.यावेळी कलाशिक्षक दतात्रय एमेकर यांचा शुभेच्छा संदेश व महाराखी उपक्रमाने भारतीय सैनिकांना उर्जा मिळेल असे प्रतिपादन यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले.
गेल्या ७ वर्षापासून त्यांच्या सुंदर अक्षर कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय सैनिकांना ३३३३ शुभेच्छा संदेश व १५ फुटाची महाराखी भारतीय सैनिकांच्या बटालीयनला दरवर्षी पाठवण्यात येते.
या शुभेच्छा संदेश विमोचन सोहळा प्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड,मुख्याध्यापक राजहंश शहापुरे ,मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे ,पत्रकार हफीज घडीवाला,महमंद सिंकदर,माजी सैनिक कांबळे ,मन्मथ थोटे,लिपीक पानपट्टे,लक्ष्मीबाई पेठकर आदीची यावेळी उपस्थिती होती.
Leave a Reply