ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कांशीराम यांनी बहुजन समाजाला जोडण्याचे काम केले- हरिष रत्नपारखे

October 10, 202114:10 PM 4 0 0

जालना/प्रतिनिधी उत्तरप्रदेशमध्ये कांशीराम यांनी बहुजन समाजाला जोडण्याचे काम केले. बहुजन समाज संघटित करुन त्यांनी सत्ता मिळवून, बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केले. मात्र सध्या उत्तरप्रदेशमध्ये जातीयवादी सरकार सत्तेत असून, तेथील बहुजन समाजावर अन्याय, अत्याचार सुरु आहे. आज उत्तरप्रदेशला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करणारे स्व.कांशीराम यांच्या सारख्या नेतृत्वाची खर्‍या अर्थाने गरज असल्याची भावना बसपाचे जिल्हाध्यक्ष हरिष रत्नपारखे यांनी व्यक्त केली. बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते स्व.कांशीराम यांचा स्मृतीदिन जालना येथे 9 ऑक्टोंबर रोजी संजय वेव्हल मेमोरियल हॉलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी रत्नपारखे बोलत होते.


यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश सचिव निवृत्ती बनसोडे हे होते यावेळी झोनकॉर्डिनेटर विवेक दहिवाळ ,जिल्हा सचिव ज्ञानेश्‍वर गरगडे, जिल्हा बीएफ संयोजक रंजीत हिवाळे, जिल्हा संघटन मंत्री मुकुंदा खरात, जिल्हा बीएफ संयोजक लालाभाई खरात ,रमेश उबाळे, भिमराव आढवे, विलास मगरे, संगीता ताई पाटोळे, राधाबाई गवळी ,अर्चनाताई खिल्लारे ,शेख इखलास , पप्पू चत्रे, रमेश म्हस्के, गौतम वानखेडे, भगवान जोगदंड दिलीप हिवाळे ,सुखदेव हिवाळे, संजय इंगळे ,दिपक हिवाळेसंतोष भाऊ बोर्डे, विशाल गवई ,विजय काळे ,सुर्वे साहेब ,बोर्डे साहेब, संजय साहेब ,घनश्याम हळदे, सचिन हिवराळे, अनिल तायडे, तायडे खरात, श्रीमंता खरात, राहुल तायडे,, धोंडीराम फुलमाळी, देविदास म्हस्के ,सचिन गाडेकर बाकीलाल सरकटे , दिलीप खरात , जुबेर शेख, बबलू पठाण ,अफसर शेख, बंटी बडगे आदि होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *