ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कर्जत खालापूरचे शिवसेनेचे आमदार गुवाहटीला, खालापूर शिवसेनेत भयाण शांतता, थोरवेंना मुकपाठिंबा ?

June 24, 202212:05 PM 20 0 0

खालापूर (कु. अदिती पवार)  : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारत गुवाहाटी गाठली आहे त्यात रायगडातील शिवसेनेचे तीनही आमदार आहेत.कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे या आमदारांमध्ये असून खालापुरात या बाबत चर्चाच चर्चा ऐकायला मिळत आहेत. पण राज्यभर या बंडखोर आमदारांविरोधा मध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले दिसले पण खालापुरात मात्र शिवसेनेत भयाण शांतता पहावयास मिळत आहे. कर्जत खालापूर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

मतदार संघात प्रत्येक गावात सेनेची शाखा आहे. शिवसेना पदाधिकारी आहेत. व शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणून अडीच वर्षांपूर्वी महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे आमदार भरघोस मतांनी निवडून आले होते. खालापुरात ही शिवसेना सध्या एक नंबर चा पक्ष बनला आहे. खोपोली न पा मध्ये 11 नगरसेवक व सत्ता, खालापूर नगरपंचायत वर सत्ता बऱ्याच ग्रामपंचायत सेनेकडे आहेत. पदाधिकारयांची मोठी फळी सेनेकडे सध्या आहे. आमदार झाल्यानंतर महेंद्र थोरवे यांनी खालापुरात व खोपोलीत शेकडो कोटी रुपये निधी विकासासाठी दिला असल्याने त्यांची या तालुक्यात चांगली पकड बसली होती. कर्जत मतदार संघातच नव्हे तर रायगडात सेनेचा मुख्य विरोधी पक्ष होता राष्ट्रवादी पण सेना महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करू लागली तसे सेना व राष्ट्रवादी ला नाईलाजाने जुळवून घ्यावे लागत होते.

पण रायगडात ते जुळले नसल्याचे सुरवाती पासून दिसत होते.रायगडात सेनेचे तीन आमदार निवडून आले होते तर अदिती सुनील तटकरे या राष्ट्रवादाच्या एकमेव आमदार निवडून आल्या असताना त्या नवख्या असताना त्यांच्या वाट्याला राज्यमंत्री पद आले व त्या रायगड च्या पालकमंत्री ही झाल्या तेव्हा खरी ठिणगी पडली व ती आग अडीच वर्षे धुमसत राहिली होती.
अडीच वर्षात सेनेच्या या तीन आमदारांनी पालकमंत्री हटाव मोहीम अगदी उघडपणे चालवली होती पण पक्षादेश पुढे त्यांना नमते घ्यावे लागले होते. शेवटी चार दिवसांपूर्वी विधानपरिषद निवडणुकी नंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आणि केबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी बंड पुकारले व आपल्या सेनेच्या सहकाऱयांबरोबर महाराष्ट्र सोडला. शिंदें बरोबर रायगडाचे तीनही आमदार सुरवातीला बाहेर पडले.

काल मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडावे लागले हे नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. राज्यात मुंबई सह अनेक जिल्ह्यात शिवसैनिक या बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरला पण रायगडात मात्र तसे काहीही घडले नाही. कर्जत काय तर खालापुरात ही शिवसेनेकडून कोणते निदर्शन अथवा आंदोलन झाले नाही. अगदी भयाण शांतता पसरलेली दिसली. सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक सावध भूमिका घेताना दिसत होते.एकानेही प्रतिक्रिया दिली नाही उलट पक्षी महेंद्र थोरावेंच्या या बंडाला एकप्रकारे मूक पाठिंबाच दिला.
सध्या खालापुरात शिवसेनेत भयाण शांतता पसरली असून मातोश्री व गुवाहाटी मध्ये काय हालचाली होतात या कडे सारे नजरा लावून बसले आहेत

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *