उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती सोहळा शुक्रवार ( दि. २४ ) रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,पनवेल येथील प्राचार्य,डॉ.गणेश ठाकूर,(माजी सचिव, रयत शिक्षण संस्था सातारा)यांनी आभासी प्रणालीद्वारे उपस्थित प्राध्यापक,सेवक व विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवनचरित्र व त्यांचा कार्याचा आढावा घेतला.रयत शिक्षण संस्था स्थापने मागील उद्देश त्यांनी अतिशय सविस्तर मांडणी केली.अध्यक्षीय मनोगतातून प्र-प्राचार्य,डॉ.साहेबराव ओहोळ यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य,डॉ.उत्तम घोरपडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुजाता पाटील यांनी केले,पाहुण्यांची ओळख प्रा.सी.डी. धिंदळे यांनी करून दिली.या कार्यक्रमास उपप्राचार्य, डॉ.विलास महाले तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले.
Leave a Reply