ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

के पग घुंगरू बांध मीरा नाची थी जीव घेतेस तू ग सखे कोजागरी पौर्णिमेला जालन्यात गीत गायन आणि कविसंमेलन रंगले

October 21, 202114:56 PM 72 0 0

 जालन  : शहरातील  प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे मित्र मंडळातर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन व गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी ( ता.१९ )  करण्यात आले होते. कार्यक्रमात मोहब्बत ‘अकल का सौदा नही’, यासह ‘जीव घेतेस तू ग सखे साजणे’ अशा गझलेने कार्यक्रमात अधिक रंगत वाढत गेली. तसेच ‘कबीरा जब हम पैदा हुये.., के पग घुंगरू बांध मीरा नाची थी’.., ‘चंद्र आहे साक्षीला’.. अशा सदाबहार गीत गायनाने कोजागरी पौर्णिमेची ही मैफल सजवली. शहरातील जुना जालना संजयनगर परिसरातील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे हे होते. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राख,प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे,मुद्रा साहित्य सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा कवी कैलास भाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गीत गायन कार्यक्रमाची सुरुवात दैनिक बदलता महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक तथा गायक विनोद काळे यांनी

 

‘कबीरा जब हम पैदा हुये, जग हसे हम रोये, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोये…’

हा संत कबीर यांचा दोहा सादर केला. त्यानंतर

‘पान जागे फुल जागे, भाव नयनी जागला..चंद्र आहे साक्षीला’ या भावगीताने मैफिलीची रंगत वाढवली. गायक गणेश देशपांडे यांनी सादर केलेल्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘के पग घुंगरू बांध मीरा नाची थी, और हम नाचे घुंगरू के’ सदाबहार गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर निमंत्रित कवींचे कविसंमेलन रंगले. कवी कैलास भाले यांनी कोरोना परिस्थितीवर परखड भाष्य करीत ‘ कोरोना ‘ कवितेतून विषय मांडला. शायर सुनील लोणकर यांनी ‘मोहब्बत अकल का सौदा नही होता’ ही गझल सादर केली. कवी कृष्णा आर्दड यांनी सादर केलेल्या ‘ जीव घेतेस तू ग सखे साजणे ‘ या कवितेला उपस्थितांनी उस्फूर्त दाद दिली. मनीष पाटील यांनी ‘ स्वर्गातील आत्म्यांनो ‘ कवितेतून शेतकरी आंदोलनावर टीकात्मक भाष्य केले.कवी डाॅ. दिगंबर दाते यांच्या ‘ दाढी ‘ कवितेने व्यवस्थेतील बदलत जाणारे संदर्भ आणि माणसाचा खोटेपणाचा बुरखा ‘ यावर वास्तवाचा वेध घेतला. कवी डाॅ. सुहास सदाव्रते यांनी सादर केलेल्या ‘मला माणसांची भीती वाटते रे’ या कवितेतून हरवलेल्या माणूसपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी कविता सादर केली.या कवितेला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शिवाजी तेलंग यांनी ‘खानदान’ , प्रा.पंढरीनाथ सारके यांनी ‘मराठी मुलखात’ , प्रा.अशोक खेडकर यांनी ‘माणसे हळुहळू सावर लागली’ ही गझल सादर केली. डाॅ.प्रभाकर शेळके रत्नमाला मोहिते, वसंत सूर्यवंशी, लक्ष्मीकांत दाभाडकर, बंडू काळे, मिलिंद घोरपडे यांनी कविता सादर केल्या.

गीत गायन तथा कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन सुहास पोतदार यांनी केले. उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन संतोष कातुरे यांनी केले. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक अकराचे नागरिक,साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम आयोजनासाठी गोपाल ठोंबरे, राजकुमार दांडगे,महेंद्र वाघमारे,किशोर ढेकळे, अर्जुन बनसोडे, पवन गाडेकर, गणेश ढोबळे, रतन जाधव, उत्तम ढोबळे, मारोती शेरकर, सुरज ढोबळे, अर्जुन ढोरकुले, त्रषीकेश ढोबळे, गणेश माळवतकर यांनी प्रयत्न केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *