ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गाय पाळल्याने ईश्वर सेवा घडते – पं. विशाल महाराज त्रिवेदी

August 22, 202212:42 PM 9 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील बालाजी नगर येथील बालाजी मंदिरात श्रावण मासानिमित्त बालाजी मंदिर ट्रस्ट तर्फे पं. विशाल महाराज मनोज त्रिवेदी यांच्या सुमधुर वाणीत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले या भागवत कथेत श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री कृष्ण जन्म अति उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यात भक्त लीन होऊन राधे कृष्ण च्या गजराने परिसर दुमदुमले होते.या गीतेत श्री कृष्णाने जसे मथुरेला झालेल्या चक्रीवदळाने वाचविण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलले होते.यात गायींचे रक्षण करणारे श्री कृष्ण आहेत.यासाठी गायीच्या सेवेतच ईश्वर सेवा असल्याचे पं. विशाल महाराज त्रिवेदी यांनी सांगितले.पुढे बोलताना म्हणाले की, जो गायीची सेवा करतो त्याला श्री कृष्ण ची सेवा केल्याप्रमाणेच आहे.

घरात कुत्रे पाळण्या ऐवजी गायी पाळावे कुत्र्या ऐवजी गायीची सेवा केल्याने ईश्वर सेवा केल्या सारखे असल्याचे श्री पं विशाल महाराज त्रिवेदी यांनी म्हटले आहे.आई वडिलांची सेवा केल्याने मोक्षला प्राप्ती होते या भागवत कथेत श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा करण्यात आला असून या उत्सवात भाविकांनी मोठी गर्दी उपस्थित होते.याला यशस्वी करण्यासाठी बालाजी मंदिर चे पदाधिकारी सदस्य यांनी अथक परिश्रम केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *