ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रीय विद्यालय एन.ए.डी.करंजा शाळेतील पालकांचे एन ए. डी. बससेवा सुरू करण्याबाबत लेखी निवेदन

June 25, 202212:10 PM 19 0 0

उरण (तृप्ती भोईर) : गेली दोन वर्षं आपण पहातोय कोविड च्या वाढत्या प्रसारामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान शाळा सुरू करण्याविषयी निर्बंध ,ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करणे हेही काही गरीब घरातील विद्यार्थ्यांना अशक्य होत असताना बऱ्याच शाळा २०२१ ऑक्टोबर उजाडताच शाळेतील मुलांचा किलकिलाट कानावर पडु लागला आहे.
पण केंद्रीय विद्यालय एन ए. डी. करंजा उरण या शाळेचे विद्यार्थी एका वेगळ्याच समस्येला सामोरे जात आहेत ते म्हणजे या शाळेत उरण व उरणच्या आसपासच्या परिसरातील बरेच विद्यार्थी शाळेत येण्यासाठी उरण बस स्थानकातून सूटणाऱ्या एन. ए. डी -उरण या बसने शाळेत ये – जा करीत असतात. परंतु कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व रोड दुरूस्ती च्या कामांसाठी ही एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे या बससेवेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना खाजगी वहानांतून, जास्तीचे पैसे खर्च करून प्रवास करणे त्रासदायक होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ४/१०/२०२१ पासून कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून हे केंद्रीय विद्यालय एन .ए .डी . करंजा उरण सुरु झाले आहे. तत्पूर्वी सदरची ही बससेवा बस जाणारा हा मार्ग कौविड-१९ च्या सुमारे दोन वर्ष अगोदरच रस्ता दुरूस्तीच्या निमित्ताने मोठमोठे खड्डे केल्यामुळे जवळपास ४ वर्षं ही बससेवा बंदच आहे या परिस्थितीचा फायदा खाजगी वाहनांनी घेतला. व वाजवीपेक्षा जास्त पैसे भरून शाळेतील विद्यार्थांना नाविलाजाने प्रवास करावा लागत होता. विद्यार्थ्यां सोबतच या बसने शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ही बससेवा लाभदायक ठरत होती. या बसमध्ये उरण व उरणच्या आसपासच्या परिसरातील विद्यार्थी प्रवास करत होते, त्यानंतर लॉकडाऊन आणि रस्तादुरूस्ती या कारणांचीही भर पडली. म्हणजे गेली ४ वर्षे ते आजपर्यंत ही बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात विद्यार्थ्यांना सुलभ एस टी बससेवा सुरू करण्याबाबत जेणेकरून विद्यार्थी शाळेच्या वेळेवर ये-जा करतील या अनुषंगाने एन ए. डी. उरण बससेवा शाळेच्या वेळेत सुरू व्हावी याकरीता उरण एस टी डेपोचे महाप्रबंधक माननीय सतिश मालचे साहेब यांच्या कडे या शाळेतील पालकवर्गाने एकत्र येऊन शनिवार दिनांक २४/६/२०२२ रोजी आपल्या सोबत पत्रकार सौ. तृप्ती भोईर यांच्या सहकार्याने या विषयावरील लेखी निवेदन सादर केले आहे. व या निवेदनाची पुर्तता लवकरात लवकर व्हावी ,अशी मागणी समस्त पालकवर्गाची आहे.
हे निवेदन सादर करतेवेळी रोशनी कांबळे, सिमा वाल्मिकी, रेखा जाधव, ज्योती पवार, शांती सरोज, रेश्मा कदम, मंगलदास कांबळे, मंदार आसुरकर, विश्वकर्मा किशन, रमेश कातकरी , मनिषा घळवट, नुर शेख, रवि आरेकर, संगिता जाधव, राजु क्षत्रिय, रोशन पासवंत, सुभाष गुलख, विलास गायकवाड, संजय गायकवाड, कालिक शेख, मेघा जाधव, आम्रपाली गायकवाड आदी पालकवर्ग उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *