शेतकरी आंदोलनामध्ये देशविरोधी, तसेच शासनविरोधी शक्तींचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आपल्याला दिसून येत आहे. मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन सलग चालू ठेवण्यासाठी खलिस्तानी चळवळीला विदेशातून
पैसे येत आहेत याचाच अर्थ की हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे षडयंत्र आहे. मोदी सरकार त्याच्या विदेश नीतीनुसार खलिस्तान्यांना पोसणार्या देशांना समज देईल काय ? हा प्रश्न भारतीयांना पडत आहेत. ‘इंदिरा को ठोक दिया, मोदी की छाती पर भी ठोक देंगे ।’ अशा घोषणा आंदोलक देत आहेत, याचा अर्थ खलिस्तान समर्थक आणि देशविघातक लोक या आंदोलनात आहेत हे लक्षात येत आहे. एका पंतप्रधानाची हत्या केलेल्या आणि दुसर्या पंतप्रधानाच्या हत्येची धमकी देणार्या या घोषणा देणारे हे नक्कीच माझ्या देशातील अन्नदाता असू शकत नाही. हे शेतकरी नसून राष्ट्रद्रोही शक्ती आहेत ? तेव्हा देशप्रेमी शेतकर्यांनीच शेतकरी आंदोलनातील देशद्रोही शक्तींना एकटे पाडून धडा शिकवावा अशी मागणी सर्व भारतीयांची असेल !
डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ
Leave a Reply