ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 खारघर शिवसेनेतर्फे सेक्टर ३५ मध्ये भरविला भव्य रोजगार मेळावा

February 28, 202214:18 PM 53 0 0

रायगड ( देवयानी कुलकर्णी) :  दि.२६ रोजी खारघर सेक्टर ३५ येथे शिवसेनेतर्फे भव्य असा रोजगार मेळावा भरवण्यात आला होता.या रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगेश रानवडे व इम्तियाज शेख यांनी केले होते.
गरजू व्यक्तींना नोकरीची चांगली संधी उपलब्ध व्हावी हाच एकमेव उद्देश या रोजगार मेळाव्याचा होता. आणि त्यासाठी खारघर शिवसेनेचे पदाधिकारी एकवटून आले व त्यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. अतिशय यशस्वीरित्या हा रोजगार मेळावा पार पडला असून गरजूंना रोजगार हेच उद्दिष्ट ठेवून भरविलेल्या या मेळाव्यात एकूण अडीचशेहून अधिक गरजू तरुण-तरुणीनी हजेरी लावली. त्यातील १०० हून अधिक गरजूंना या प्लॅटफॉर्म द्वारे नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला असून या रोजगार मेळाव्याचे सर्व श्रेय शिवसेना पदाधिकाऱ्यांना जात आहे. तसेच या रोजगार मेळाव्याचे सार्थक झाले असे म्हणण्यास काही हरकत नाही.
भव्य अशा या मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमात त्यांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी या कार्यक्रमास हातभार लावणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार मानले. व या गोष्टीचे त्यांना व सर्व शिवसैनिकांना खूप समाधान आहे असेही ते म्हणाले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *