ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खुरगाव हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र बनणार – राजरत्न आंबेडकर

September 13, 202113:26 PM 16 0 0

नांदेड – धम्माचा प्रसार आणि प्रचार वेगाने व्हावा यासाठी खुरगावचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. देशभरात ज्यांना कुणाला श्रामणेर दीक्षा घ्यायची आहे, अशांना ३६५ दिवस चालणारे हे एक हक्काचे श्रामणेर केंद्र आहे. लवकरच आपण या पवित्र भूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊ तसेच हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आंतरराष्ट्रीय किर्तीचे केंद्र बनणार अशी प्रांजळ भूमिका भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी तालुक्यातील खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बोलताना मांडली. यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो, भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन यांच्यासह श्रामणेर भिक्खू संघ, धम्मसेवक गंगाधर ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, दिनेश हनमंते, वैभव धबडगे, राहुल घोडके, प्रकाश मगरे, वैभव खिल्लारे आदींची उपस्थिती होती.


भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ट्रस्टी चेअरमन राजरत्न आंबेडकर हे चार दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास सदिच्छा भेट दिली. आंबेडकर यांचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने स्वागत केले. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प पूजन करण्यात आले. तसेच प्रशिक्षण केंद्र परिसरात पिंपळवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. ते बोलतांना पुढे म्हणाले की, धम्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करणं ही आता आपली जबाबदारी आहे. आपण सर्वचजण संघटित होऊन काम करु या. भिक्खू हे या चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. उपासकांनीही अत्यंत निष्ठेने काम केले पाहिजे, याची जाणीव त्यांनी यावेळी केली. प्रास्ताविक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले तर आभार गंगाधर ढवळे यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *