ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

साहित्यातील राजकारण चळवळीला मारक – डॉ. जगदीश कदम

July 1, 202112:49 PM 34 0 0

नांदेड – नवोदित साहित्यिकांना डावलण्याची प्रक्रिया पुरातन आहे. त्यांनी कितीही आशयगर्भ लेखन केले तरी त्यांना नवोदित ठरवून अनुल्लेखाने मारले जाते. नव्याने लिहिणारे लेखक कथा कवितांबरोबरच कांदबरी लेखनही दर्जेदार करीत आहेत. मर्जीतल्या आणि सुमार दर्जा असणाऱ्या लेखकांना संधी मिळते आणि चांगले लेखक मागेच राहतात. साहित्यातील हे राजकारण साहित्य चळवळीला मारक ठरते, असे प्रतिपादन येथील ख्यातनाम साहित्यिक तथा पुरोगामी साहित्य चळवळीतील विचारवंत डॉ. जगदीश कदम यांनी येथे केले. विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी स्थानिक लेखकांना ६० टक्के या प्रमाणात प्राधान्य द्यायला हवे, असेही ते म्हणाले.

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जगदीश कदम, प्रा. निर्मलकुमार सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, श्रीकांत मगर, साईनाथ रहाटकर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कदम यांनी विचार व्यक्त केले. खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातही नागोराव डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, भाटापूरकर आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *