ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी किरण राजे कोथलकर

August 29, 202115:04 PM 13 0 0

जालना ( प्रतिनिधी) : जालना जिल्हा युवा सेनेच्या उपजिल्हाप्रमुख अधिकारी पदी वालसावंगी ता. भोकरदन येथील धडाडीचे, सक्रिय युवासैनिक ,तथा शेतीनिष्ठ कवी, किरण राजे कोथलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते शनिवारी ( ता. २८)त्यांना नियुक्ती पञ देण्यात आले. यावेळी युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील पुंगळे, शिवसेना तालुका प्रमुख माधवराव पाटील हिवाळे यांची उपस्थिती होती.

मागील वीस वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले किरण राजे कोथलकर यांनी जनहितासाठी पक्षाने केलेली आंदोलने, सभा मिळावे ,विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांमध्ये निष्ठेने पक्षाचे कार्य केले आहे. सोबतच आपल्या काव्य लिखाणातून शेती, शेतकरी,मातृशक्ती, ग्रामीण तरुण, महिला, यांची दु:ख ,वेदनांची ते मांडणी करत आहेत. त्यांचे पक्ष कार्य व निष्ठेची दखल घेत युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर व जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी सदर नियुक्ती केली. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा सेना प्रमुख ना. आदित्य ठाकरे व सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार तसेच माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे यांच्या मान्यतेने युवा सेना उपजिल्हा प्रमुख अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून कार्य करतांना शिवसेना प्रमुखांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना बळकटी साठी प्रयत्न करावेत. असे त्यांना दिलेल्या नियुक्ती पञात नमूद करण्यात आले. या नियुक्तीबद्दल किरण राजे कोथलकर यांचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील गव्हाड ,मनीष श्रीवास्तव, तालुकाप्रमुख नवनाथ दौंड , भोकरदन तालुका संघटक महेश पुरोहित , शहर प्रमुख भूषण शर्मा यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व युवा सैनिकांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, पदाधिकारी व युवा सैनिकांना विश्वासात घेऊन तळागाळापर्यंत संघटना बळकट करण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील राहणार असल्याचे किरण राजे कोथलकर यांनी सांगितले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *