ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्वयंपाक घरातील औषध पालक

October 28, 202113:59 PM 67 0 0

1) पालकला गुणकारी मानले जाते कारण पालकमुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. जेव्हा कधी आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे आपल्या शरीरातील कमतरता भरून निघते.? पालकमध्ये विविध गुणधर्म आढळून येतात.

2) पालकच्या पानांचा रस आणि नारळाचे पाणी समान मात्रामध्ये मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास मूतखडा विरघळून बाहेर पडतो.

3) कच्चे पालकही खूप गुणकारी आहे. त्यामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहते. खोकला किंवा फुप्फुसामध्ये सूज असल्यास पालकच्या रसाने गुळण्या केल्यास लाभ होतो.

4) ताज्या पालकचा रस दररोज प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आयोडीन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.

5) लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज पालकच्या भाजीचे सेवन करावे.

6) कावीळ झालेल्या रुग्णाला पालकचा आणि कच्च्या पपईचा रस एकत्र दिल्यास आराम मिळेल.

7) हृदयाचा आजार असलेल्या लोकांनी दररोज एक कप पालकच्या रसाचे २ चमचे मध घालून सेवन करावे.

8) रक्ताची कमतरता असल्यास दररोज एक ग्लास पालकचा ज्यूस प्यायल्यास कमतरता भरून निघते.

9) पालकच्या रसाने गुळणी केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते व दातांच्या समस्या दूर होतात.

10) पालकमुळे केस दाट व लांब होतात.

11) पालकमुळे दात मजबूत होण्यास मदत होते.

Categories: आरोग्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *