खोपोली – खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.एम.सी. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागास पीएच.डी. संशोधन केंद्राची मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. सन 1979 साली आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान कै.बी.एल.पाटील साहेब आणि तत्कालीन सर्व संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, संचालक यांच्या स्वप्नातून सुरू झालेल्या के. एम.सी. महाविद्यालयात पदवी-पदव्युत्तर पदवी पासून आता संशोधनपर अभ्यासाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. केटीएसपी मंडळाच्या माध्यमातून एकाच छत्राखाली KG to PG अशी सुविधा उपलब्ध होतीच.
आता संशोधनपर शिक्षणक्रम महाविद्यालयात सुरू झाल्यामुळे खोपोली, खालापूर, कर्जत, नेरळ, चौक, वावोशी या परिसरातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी चे संशोधन के.एम.सी. महाविद्यालयातून करता येणार आहे. ही संस्थेसाठी व महाविद्यालयासाठी गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे. के.एम.सी. महाविद्यालयात बी.ए. बी.कॉम. बीएस्सी पदवी, एम.कॉम, एम.एससी. (संगणकशास्त्र व रसायनशास्त्र) हे शिक्षणक्रम सुरू आहेत. महाविद्यालयास हे संशोधन केंद्र मिळण्यासाठी संस्थेचे सर्व माजी अध्यक्ष, सेक्रेटरी, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यमान अध्यक्ष मा.संतोष जंगम, उपाध्यक्ष मा. संजय पाटील, कार्यवाह मा.किशोर पाटील महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा.राजेश अभाणी या सर्व मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. सर्वांप्रती महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो.आपल्या सर्वांच्या प्रेरणेने, सहकार्याने व मार्गदर्शनाने असे नवीन-नवीन शिक्षणक्रम आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आहोत. त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद अश्या शब्दात प्राचार्य महेश खानविलकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
Leave a Reply