ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोकिसरे खांबलवाडी शाळेने केक कापून साजरा केला आंतरराष्ट्रीय महिला दिन

March 14, 202212:42 PM 65 0 0

सिंधुदुर्ग प्रतिनिधी (सौ.संपदा बागी-देशमुख) : महिला दिनाचे औचित्य साधत कोकीसरे खांबलवाडी शाळेचे शिक्षक, महिला व विद्यार्थी यांनी केक कापून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला. या दिवशी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री.संतोष टक्के सर रोटरी क्लब अध्यक्ष वैभववाडी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

श्री.गोविंद टक्के (आबा) शाळा समिती कोकिसरे खांबलवाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या महिला दिन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री.संतोष टक्के सर, मा. श्री.विद्याधर सावंत सर, मा.श्री.समाधान जठार उपाध्यक्ष शाळा समिती कोकिसरे खांबलवाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.धकलशेठ सरवणकर, उपाध्यक्ष मा.श्री.संकेत रावराणे,मा.श्री. बबन बेळेकर आदी उपस्थित होते.
महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे.आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन श्री.संतोष टक्के सर यांनी केले.स्त्रियांनी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतला पाहिजे.आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य जोपासले पाहिजे असे मार्गदर्शन श्री.विद्याधर सावंत सर यांनी केले.
महिलांसाठी शाळेच्या वतीने फनी गेम्स देखील आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निलोफर शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्तावित सौ.स्वाती दराडे यांनी केले.कार्यक्रमासाठी मा.श्री. शिनगारे सर गटशिक्षणाधिकारी यांनी व खांबाळे केंद्राचे केंद्र प्रमुख मा. श्री.पवार सर यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक, पालक यांनी परिश्रम घेतले..

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *