ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरुड जंजिरा ‌तर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

September 7, 202113:15 PM 7 0 0

मुरूड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरुड जंजिरा तर्फे ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.प्रथम दक्षिण रायगड जिल्ह्याध्यक्ष तथा मुरुड जंजिरा शाखा अध्यक्ष माननीय संजयजी गुंजाळ, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय दिपाली दिवेकर मॅडम, कार्याध्यक्ष ‌अरूण बागडे,माजी अध्यक्षा प्रतिभा जोशी ,डाॅ.रविंद्र नामजोशी या मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. कार्याध्यक्ष अरूण‌ बागडै‌ यांनी‌ सरस्वती पूजन करून देवीला हार अर्पण केला. कार्याध्यक्ष श्री. अरुणजी बागडे यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले आणि प्रास्ताविकात शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रमाविषयी रूपरेषा सांगितली. सौ प्रतिभा मोहिले यांनी गजमुखा वंदन तुज पाहिले राजस तुझी या पदकमलावर सुमनावर वाहिले” या गीताने गणेश वंदना केली.


प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ नैनिता कर्णिक,सौ उषा खोत‌,सौ वैशाली कासार,सर.एस‌ ए‌ हायस्कूल सेवानिवृत्त ‌शिक्षक, तथा नगरपालिका‌ मुरूड पाणी पुरवठा सभापती पांडुरंग आरेकर,कार्यरत कला शिक्षक रांगोळीकार महेंद्र पाटील सर,वसंतराव नाईक महाविद्यालय मुरूड येथील‍ इंदिरा गांधी गोल्डन मेडल प्राप्त मधुकर वेदपाठक सर या सर्वांना शाल,श्रीफळ व सोनचाफ्याची फुले देऊन प्रमुख पाहुण्या सन्माननीय नगरपालिका प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर मॅडम यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच औचित्य साधून कराटेपटू प्रसाद चौलकर यांची आंतरराष्ट्रीय किकबाॅक्सिग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ‌मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सौ उर्मिला नामजोशी यांनी सूत्रसंचालनात प्रत्येक शिक्षकांचे विशेष गुण सांगितले.
कार्यक्रमात गार्गि जोशी हिने कणा‌ कविता सादर केली. प्रमुख पाहुण्या सन्माननीय दिपाली दिवेकर मॅडम यांनी आपल्या भाषणात गुरू शिष्याचे नाते कसे अतुट असते हे आपल्या आलेल्या अनुभवातून व्यक्त केले. मला माझ्या गुरूजनांचा सत्कार करण्याचे मला भाग्य लाभले व कृतज्ञता व्यक्त करण्यास मिळाली ह्याचा मला आनंद आहे असे नमुद केले. माजी अध्यक्षा प्रतिभा जोशी यांनी डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती सांगताना शिक्षकांनी नुसता शिक्षकी पेशा न समजता सेवा म्हणून या क्षेत्रात काम करावे असे नमुद केले.
अध्यक्षीय भाषणात संजयजी गुंजाळ यांनी आजच्या कार्यक्रमामुळे मला माझ्या गुरूजनांचा सत्कार करण्याचा मान मिळाल्याचा आनंद आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
कार्यक्रमास डॉ नामजोशी, सुनील मोहिले, ‌कवी आशिष पाटील उपस्थित होते. सौ उर्मिला नामजोशी यांनी सूत्रसंचालन उत्तम केले. कवी सिद्धेश लखमदे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि जेष्ठ शास्त्रीय संगीत गायक डॉ. रविंद्र नामजोशी यांनी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *