मुरुड जंजिरा (सौ नैनिता कर्णिक) : कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड तर्फे कोजागिरी संध्या मैफल कार्यक्रम कोकण मराठी साहित्य परिषद दक्षिण रायगड संजयजी गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्षा सौ उषा खोत यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. दीपप्रज्वलन वगणेश पूजनअध्यक्ष संजयजी गुंजाळ,उपाध्यक्षा सौ उषा खोत ,कार्याध्यक्ष अरूण बागडे,कार्यवाह डाॅ.मधुकर वेदपाठक सर,डाॅ. रविंद्र नामजोशी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपाध्यक्षा सौ उषा खोत यांच्या तर्फे यांच्या तर्फे तुळशिंची रोपे देऊन उपस्थित , मान्यवर ,पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करून झाडे लावा,झाडे जगवा असा संदेशही देण्यात आला.
कार्याध्यक्ष अरूण बागडे यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रुपरेखा सांगीतली. डाॅ.रविंद्र नामजोशी जेष्ठ शास्त्रीय गायक यांनी सदर कोजागिरी संध्या मैफलीची सुरूवात शारदामातेचे गीत सुंदर आवाजात गाऊन ईशस्तवन केले. तद्नंतर संजयजी गुंजाळ,माजी अध्यक्षा प्रतिभाताई जोशी , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ वैशाली कासार , सौ नैनिता कर्णिक,सौ उषा खोत, प्राध्यापक डाॅक्टर मधुकर वेदपाठक सर, नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती पांडुरंग आरेकर सर, सेवानिवृत्त तहसीलदार नयन कर्णिक ,प्रशासनाधिकारी दिपाली दिवेकर मॅडम,कवी सिध्देश लखमदे,आशिष पाटील,योगेश दवटे,सौ प्रतिढा मोहिले, सौ वासंती उमरोटकर,सौ उर्मिला नामजोशी लहान कलाकार कु धार्मि लखमदे यांनी काहींनी आपल्या स्वरचित कविता कोणी अभिवाचन, काव्य वाचन,किस्से,आपल्या काही आठवणीना उजाळा दिला. गप्पा गाणी गोष्टी सांगून कोजागिरी संध्या मैफल कार्यक्रमाची रंगत वाढविली.मैफल रंगली असतानांच मुरुड मधील प्रसिद्ध चित्रकार,रांगोळीकार महेंद्र पाटील सर यांनी कलाकाराचे चित्र रेखाटले त्या मुळे मैफल कार्यक्रम उत्साहात अधिकच भर पडली. कोजागिरी संध्या मैफल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ सायली गुंजाळ,सुधीर खोत,सचिन सुभेदार, प्रतिक कातारे यांनी मोलाचे सहकार्य केले. सौ उर्मिला नामजोशी मॅडम यांनी कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन केले.सौ नैनिता कर्णिक मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल मन:पूर्वक आभार मानले. प्रतिक कातारे यांनी सुंदर रांगोळी काढली असल्याचे नमुद करून आभार व कौतुक केले. व कार्यक्रमाची सांगता केली.
Leave a Reply