सातारा,(विदया निकाळजे) कोरेगाव इनर व्हील क्लबच्या वतीने आदर्श महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळातही ज्ञानाचा दिवा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यां पर्यंत पोचविणाऱ्या कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागातील महिला शिक्षकांना यावेळी गौरव प्रमाणपत्र,सन्मान पत्र आणि पुष्प देऊन गौरव करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील हुतात्मा स्मारकात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी क्लबच्या अध्यक्षा शशिकला ओसवाल आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आदर्श महिलांना शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामीण व शहरी भागातील शिक्षिका सीमा फडतरे,कविता अटक,छाया काटकर, चित्रा घोडके, सुनीता बर्गे,मुस्कान आतार,यास्मिन बागवान,रुपाली शहा,सीमा बर्गे,वैशाली डोईफोडे, उषा गोरे, विदया बनसोडे,संगिता उबाळे,पद्मा पलूसकर,सुजाता ढाणे ,रेखा पवार,निशा ढाणे,प्रज्ञा गुरव,जयश्री यादव,सविता नलावडे,स्वप्नजा देशपांडे, सारिका पवार,संपदा भोसले,राबन मुल्ला,अश्विनी साळुंखे आदी शिक्षिकांना गौरवण्यात आले. कार्यक्रमास इनर व्हीलच्या पदाधिकारी सुनीता मोरे,संजीवनी मोरे,स्वाती बर्गे,रोहिणी बर्गे,प्रतिभा भंडारे,कांचन थिटे आदी मान्यवर उपस्थित होत्या. शशिकला ओसवाल यांनी स्वागत केले सचिव नलिनी बर्गे यांनी आभार मानले.
Leave a Reply