ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोटगाव ग्रामस्थ मंडळ व प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था वतीने पूरग्रस्थानसाठी मदत

July 28, 202114:57 PM 69 0 0

उरण (संगिता पवार ) प्रतींनिधी  : येथील उरण कोटगाव ग्रामस्थ मंडळ व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था यांच्या वतीने सोमवार (दि. २६ )जुलै रोजी महाड येथील तहसिलदार सुरेश कासिंद यांच्या कडे जीवनावश्यक वस्तू स्वाधीन केल्या.


महाड ,पोलादपूर ,चिपळूण ,सातारा ,सांगली ,कोल्हापूर ,जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबे उद्वस्त झाली आहेत .सरकार प्रशासन सारेच त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत .प्रकल्पग्रस्तांचे अश्रू पुसण्यात आपलाही खारीचा वाटा असावा या भूमिकेतून उरण तालुक्यातील उरण शहरातील उरण कोटगाव ग्रामस्थ मंडळ व कोट गाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीला धावून गेले आहेत .एक हात मदतीचा या उद्देशाने मदत करीत आहेत .महाड चे आमदार भरत शेठ गोगावले यांनी सर्वांचे आभार मानले आहेत .
पूरग्रस्तांसाठी २६० पाणी पिण्याच्या बाटल्या ,१० बॉक्स बिस्किटे ,१०० पाकीट मेणबत्त्या ,यादी वस्तू देण्यांत आल्या
या वेळी उरण कोटगाव ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष निलेश भोईर , कोटगाव प्रकल्पग्रस्त. कृती सेवा संस्था अध्यक्ष नवनीत भोईर ,कार्याध्यक्ष निलेश भोईर ,उपाध्यक्ष कृष्णा जोशी ,सचिव सुनील भोईर ,सहसचिव हेमदास गोवारी ,खजिनदार सुरज पाटील ,सह खजिनदार भालचंद्र भोईर ,सदस्य दिपक भोईर ,महेश भोईर ,प्रकाश पाटील ,नित्यानंद भोईर ,सुभाष भोईर ,सुनील पाटील ,विश्वास पाटील ,दिलीप कोळी ,अजित भोईर ,दिपक भोम्बले , देवेंद्र शिंदे , सल्लगार माणिक पाटील ,तुकाराम कोळी ,हरिचंद्र भोईर ,देविदास गोवारी ,मोरेश्वर भोईर ,रामकृष्ण भोईर ,विजय पाटील ,परशुराम भोईर ,आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *