ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समिती 2022 ची कार्यकारिनी जाहिर

March 27, 202213:42 PM 33 0 0

जालना (प्रतिनिधी) ः क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समिती 2022 ची कार्यकारिनी दि. 26 मार्च शुक्रवार रोजी अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी शंकर सातपुते तर कार्याध्यक्षपदी पांडूरंग शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीला संतोष जमधडे, आश्‍विन आंबेकर, महेंद्र रत्नपारखे, राजु पवार, राजेंद्र जाधव, हरीष रत्नपारखे, अनिल वाघमारे, ॲड. दैने, नन्नभाऊ कांबळे, ताहेर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समितीची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. उपाध्यक्षपदी वैभव वानखेडे, सचिव निखील पाऊलबुद्धे, कोषाध्यक्ष शिव पखाले, सहसचिव स्पप्नील श्रीसुंदर, स्वागताध्यक्ष नितीन इंगळे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी दशरथ तोंडूळे, राम देवकर, प्रकाश इंगळे, मंगलताई खांडेभराड, मंजुषा घायाळ, अंकुश गायकवाड, निलेश वानखेडे, विष्णू घायाळ, योगेश खरात, राम गिराम, एकनाथ घोलप, शिवकुमार राऊत, आमोल राऊत, दादाराव डांगे, करण खांडेभराड, राजेश तोंडूळे, संचिन गाढेकर, अजय चापलवार, अब्दुल मोही, आरेफ खान, अनिकेत मुळे, शुभम खंदारे, राहुल पहाडे, अनिकेत तुपे, प्रविण भिंगारे, आकाश वैद्य, विजय साखरे आदींनी या नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. सदरील बैठकीचे आयोजन दिपक वैद्य यांनी केले होते. या बैठकीचे सुत्रसंचालन संतोष डोंगरखोस यांनी केले तर आभार बाळासाहेब तिडके यांनी मानले.
गोर-गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारणार ः दिपक वैद्य
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीने समाजातील गोर-गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्व समिती स्विकारणार असल्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष दिपक वैद्य यांनी सांगीतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *